चुरशीच्या लढतीत जमशेदपूरची नॉर्थईस्ट युनायटेडवर 3-2 मात

नॉर्थईस्ट युनायटेडला 12वा पराभव पत्करावा लागला
Jamshedpur beat Northeast United
Jamshedpur beat Northeast United Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी ः सामना संपण्यास सहा मिनिटे असताना बदली खेळाडू ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे याने केलेल्या गोलमुळे जमशेदपूर एफसीला आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या उपांत्य फेरीनजीक आला. चुरशीच्या लढतीत त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडवर शुक्रवारी 3-2 अशी निसटती मात केली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत दोन्ही संघ 84व्या मिनिटापर्यंत 2-2 असे गोलबरोबरीत होते. सामन्यातील पंधरा मिनिटे असताना मैदानात उतरलेल्या जॉर्डन मरे याने ग्रेग स्टुअर्टच्या असिस्टवर जोरदार मुसंडी मारत प्रतिस्पर्धी गोलरक्षक मिर्शाद मिचू याला सपशेल चकवले. 

Jamshedpur beat Northeast United
गोव्याच्या चौघींची विश्वकरंडक फिनस्विमिंगसाठी निवड

प्ले-ऑफ फेरीतील जागेसाठी आता जमशेदपूरला बाकी तीन सामन्यांतून फक्त एका गुणाची आवश्यकता आहे.

त्यापूर्वी, दोन गोलच्या पिछाडीवरून एका मिनिटात बदली खेळाडूंनी दोन गोल केल्यामुळे नॉर्थईस्टला बरोबरी साधता आली. लाल्डानमाविया राल्टे याने 66व्या, तर ब्राझीलियन मार्सेलो परेरा याने 67व्या मिनिटास गोल केल्यामुळे गुवाहाटीच्या संघाने जमशेदपूरची आघाडी भेदण्यात यश मिळविले. त्याअगोदर, 35व्या मिनिटास शानदार हेडिंगवर सेईमिन्लेन डौंगेल याने जमशेदपूरला आघाडी मिळवून दिली. नंतर 59व्या मिनिटास स्कॉटलंडच्या ग्रेग स्टुअर्ट याने मोसमातील दहावा गोल केल्यामुळे ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला 2-0 असे वर्चस्व मिळविता आले.

Jamshedpur beat Northeast United
सकारात्मकता हेच एफसी गोवाचे ध्येय, मुंबई सिटीच्या वाटचालीत अडथळा

जमशेदपूर एफसी दुसऱ्या स्थानी

जमशेदपूर (Jamshedpur) एफसीचा हा सलग चौथा, तर एकंदरीत दहावा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे 17 लढतीनंतर 34 गुण झाले असून दुसरा क्रमांक कायम राहिला. अग्रस्थानावरील आणि प्ले-ऑफ फेरी निश्चित केलेल्या हैदराबाद एफसीपेक्षा त्यांचा एक गुण कमी आहे. नॉर्थईस्ट युनायटेडला 12वा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 19 लढतीनंतर 13 गुण आणि दहावा क्रमांक यात फरक पडला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com