IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी! 'हे' दिग्गज खेळाडू खेळणार इंडिया ए संघाकडून?

India Tour of South Africa: दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारत अ संघाकडून काही दिग्गज खेळाडू खेळताना दिसू शकतात.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India A vs South Africa A:

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. हा दौरा 10 डिसेंबर रोजी चालू होणार आहे.

दरम्यान, या दौऱ्यातील 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा अ (India A) संघही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारत अ संघ दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 3 चार दिवसीय प्रथम श्रेणी सामने खेळण्याची शक्यता आहे. या सामन्यांमध्ये भारताच्या वरिष्ठ संघातील काही खेळाडूही सरावाच्या दृष्टीने खेळण्याची शक्यता आहे.

Team India
Team India: वर्ल्डकपनंतर दोनच महिन्यात 'हा' संघ पुन्हा येणार भारत दौऱ्यावर, वेळापत्रक आले समोर

खरंतर बीसीसीआय बऱ्याचदा वरिष्ठ संघाच्या मोठ्या परदेशी दौऱ्यावेळी अ संघाचाही दौरा आयोजित करत असते. मात्र, गेल्यावर्षाच्या अखेरीनंतर वनडे क्रिकेट वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित असल्याने अ संघाचे असे दौरे फारसे झाले नव्हते.

मात्र, आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अ संघाला पाठवले जाऊ शकते. यावेळी आर अश्विन, जयदेव उनाडकट, अजिंक्य रहाणे असे भारताच्या कसोटी संघात खेळणारे खेळाडूही भारत अ संघाकडून एक किंवा दोन सामने खेळताना दिसू शकतात.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 दरम्यान भारत अ संघ पाच किंवा सहा प्रथम श्रेणी सामने खेळताना दिसू शकतो. यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 आणि इंग्लंड अ संघाविरुद्ध 2 किंवा 3 सामन्यांचा समावेश आहे. कारण भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

Team India
IND vs AUS: सूर्यकुमार बनला भारताचा 13 वा T20 कर्णधार! पहिला सामना जिंकल्यानंतर म्हणाला...

याबद्दल बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला सांगितले की 'हो भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमध्ये 2 चार दिवसीय सामने होणार आहेत. काहीदिवसांनी यासाठी संघाची घोषणा केली जाईल. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारे काही युवा खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी सराव करण्याची गरज असणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंना अ संघात संधी जाईल.'

भारताच्या अ संघात अभिमन्यू ईश्वरन, बी साई सुदर्शन, यश धूल, के भरत, उपेंद्र यादव, सौरभ कुमार यांना संधी मिळू शकते. तसेच जयदेव उनाडकट, पुलकीत नारंग यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विद्वथ कावेरप्पा, कुलदीप सेन, हर्षित राणा, उमरान मलिक असे वेगवान गोलंदाजही या संघात असू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com