IND vs SA: रोहितचं आक्रमण ते सूर्या-जड्डूचा कॅमियो, भारताने द. आफ्रिकेला नमोहरण करण्याची 5 कारणे

India vs South Africa World Cup: भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवत वर्ल्डकप 2023 मध्ये सलग 8 व्या विजयाची नोंद केली.
Team India
Team IndiaX/BCCI
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs South Africa:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (5 नोव्हेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात भारताने 243 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 327 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 27.1 षटकात सर्वबाद 83 धावाच करता आल्या.

भारतीय संघाचा हा या स्पर्धेतील सलग आठवा विजय ठरला आहे, त्यामुळे भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पक्के केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेसाठी हा या स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेचेही उपांत्य फेरीतील स्थान पक्के आहे. दरम्यान, भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, याचा आढावा घेऊ.

Team India
HBD Virat Kohli: विराट कोहलीचा प्रवास म्हणजे दिल्ली का छोरा ते क्रिकेटचा 'किंग'

नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माची आक्रमक सुरुवात

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो भारतीय फलंदाजांनी योग्य सिद्ध केला. दरम्यान, भारताच्या डावाला कर्णधार रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करून दिली होती. त्याने अगदी सुरुवातीपासून आक्रमक फटकेबाजी केली.

त्याच्या फटकेबाजीमुळे भारताच्या खात्यात पहिल्या 6 षटकात जवळपास 10-11 च्या धावगतीने धावा जोडल्या जात होत्या. त्याला दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने चांगली साथ दिली होती. रोहित 24 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावा करून बाद झाला.

श्रेयस अय्यर - विराट कोहलीची भागीदारी

रोहित आणि शुभमन काही अंतराने बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फलंदाजांनी भारताचा डाव सांभाळला. विराट स्थिर खेळत असताना श्रेयस अय्यरने सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यास थोडा वेळ घेतला.

त्यानंतर मात्र, श्रेयसने एका बाजूने आक्रमण केले. त्यामुळे विराट आणि श्रेयस यांची जोडी दक्षिण आफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरली. त्यांच्या भागीदारीदरम्यान दोघांनी अर्धशतकाचा टप्पाही पार केला. अखेर 37 व्या षटकात श्रेयस 77 धावांवर बाद झाल्याने त्यांची 134 धावांची भागीदारी तुटली. पण विराटने अखेरपर्यंत खेळत शतकही पूर्ण केले.

Team India
HBD Virat Kohli: 'भूमिका कोणतीही असो तो...', झिरो बॉल विकेटबद्दल पोस्ट करत अनुष्काच्या विराटला हटके शुभेच्छा

सूर्यकुमार-जडेजाचा कॅमियो

श्रेयस बाद झाल्यानंतर केएल राहुलही स्वस्तात 8 धावांवर माघारी परतला होता. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादव आणि रविंद्र जडेजा यांनी छोटेखानी पण आक्रमक खेळी करत भारताला 300 धावांचा टप्पा पार करुन देण्यात मोलाचा वाटा उचलला. यावेळी एक बाजू विराटने सांभाळलेली होती.

सूर्यकुमारने 14 चेंडूत 5 चौकारांसह 22 धावा केल्या. त्यानंतर जडेजाने अखेरच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकारांसह जोरदार हल्ला केला. त्याने 15 चेंडूत नाबाद 29 धावांची खेळी केली. विराट 101 धावांवर नाबाद राहिला.

सिराजने करून दिली शानदार सुरुवात

या संपूर्ण स्पर्धेत धोकादायक फलंदाजी म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे पाहिले गेले होते. त्यामुळे या सामन्यातही ते भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान निर्माण करतील, असे अंदाज अनेकांनी वर्तवले होते.

मात्र, या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असलेल्या क्विंटन डी कॉकला मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात सुरेख चेंडू टाकत त्रिफळाचीत केले. त्यामुळे डी कॉक अवघे 5 धावा करून माघारी परतला. या पहिल्या धक्क्यानंतर दक्षिण आफ्रिकेला नंतर सावरताच आले नाही.

Team India
World Cup 2023: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याने मोडला लाईव्ह स्ट्रीमिंगचा रेकॉर्ड; इतक्या कोटी प्रेक्षकांनी लाईव्ह पाहिला सामना

जड्डूचा पंजा अन् शमी-कुलदीपचं योगदान

जडेजाने फलंदाजीत हल्ला चढवल्यानंतर गोलंदाजीतही त्याची लय कायम ठेवली. मोहम्मद सिराजने पहिला धक्का दिल्यानंतर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजाने अचूक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेची धोकादायक मधली फळी उद्ध्वस्त केली.

शमीने एडेन मार्करम आणि रस्सी वॅन डर द्युसेनला टीकू दिले नाही, तर जडेजाने तेंबा बाऊमा, डेव्हिड मिलर आणि ओन्रिक क्लासेनला स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या तळातल्या फलंदाजांनाही जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंच्या जोडीनेही फार काळ टीकू दिले नाही.

दरम्यान, जडेजाने अवघे 33 धावा देत 5 विकेट्स घेतल्या, तर शमी आणि कुलदीपने प्रत्येकी 2 विकेट्स घेत आपले योगदान दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com