Spanish Super Cup: रिअल मद्रिदने कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोनाला पराभूत करत जिंकले विजेतेपद; विनिसियसची हॅट्रिक

Real Madrid: रिअल मद्रिद संघाने रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोनाला पराभवाचा धक्का देत स्पॅनिश सुपर कप स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
Real Madrid won Spanish Super Cup
Real Madrid won Spanish Super CupX/realmadriden
Published on
Updated on

Real Madrid won Spanish Super Cup:

रिअल मद्रिद संघाने रविवारी (14 जानेवारी) मोठे यश मिळवले आहे. रिअल मद्रिदने रविवारी स्पॅनिश सुपर कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोना एफसी संघाला पराभवाचा धक्का दिला. अंतिम सामन्यात रिअल मद्रिदने 4-1 अशा गोलफरकाने दणदणीत विजय मिळववा.

रिअल मद्रिदसाठी विनिसियस ज्युनियर विजयाचा हिरो ठरला. त्याने या सामन्यात गोलची हॅट्रिक साधली.

रिअल मद्रिदने या सामन्यात सुरुवातीपासून वर्चस्व ठेवले होते. त्यांच्याकडून ज्युड बेलिंगघम, रोड्रिगो आणि विनिसियस यांनी सातत्याने बार्सिलोनाच्या बचावाला आव्हान दिले. या सामन्याच्या सातव्याच मिनिटाला बेलिंगघमच्या असिस्टवर विनिसियसने रिअल मद्रिदसाठी पहिला गोल नोंदवला.

Real Madrid won Spanish Super Cup
Ronaldo vs Messi: रोनाल्डो-मेस्सी पुन्हा येणार आमने-सामने! सामन्याची तारीखही ठरली

त्यानंतर रोड्रिगोच्या पासवर विनिसियसने 10 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. बार्सिलोनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्या हाफमध्ये मद्रिदचेच वर्चस्व राहिले.

तरी 33 व्या मिनिटाला बार्सिलोनाकडून रॉबर्ट लेवान्दोस्कीने गोल नोंदवत मद्रिदची आघाडी कमी केली होती. मात्र 39 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर विनिसियसने गोलची हॅट्रिक साधली. त्यामुळे हाफ टाईम संपला, तेव्हा मद्रिद 3-1 अशा फरकासह आघाडीवर होते.

दुसऱ्या हाफमध्येही बार्सिलोनाला फार काही करता आले नाही. त्यातच 64 व्या मिनिटाला रिअल मद्रिदसाठी रोड्रिगोने चौथा गोल नोंदवत संघाची आघाडी आणखी भक्कम केली. दुसऱ्या हाफमध्ये बार्लिलोनाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना रिअल मद्रिदने जिंकला.

Real Madrid won Spanish Super Cup
Football Ground : मयेतील फुटबॉल मैदानाचे भाग्‍य लवकरच उजळणार! खेळाडूंमध्‍ये उत्‍साह

या विजयानंतर रिअर मद्रिदचे मॅनेजर कार्लो अँसेलोटी यांनी विनिसियसने कौतुक केले. त्यांनी म्हटले, 'मी अपेक्षा केली नव्हती की आम्ही इतक्या लवकर तीन गोल करू, पण आम्ही त्यांच्या चांगल्या बचावफळीचा फायदा घेतला. विनिसियसची कामगिरी आज चांगली राहिली.' याशिवाय अँसेलोटी यांनी संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, या पराभवानंतर बार्सिलोनाचे मॅनेजर झावी यांनी त्यांच्या चाहत्यांची माफी मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com