Lionel Messi vs Cristiano Ronaldo
Lionel Messi vs Cristiano RonaldoX

Ronaldo vs Messi: रोनाल्डो-मेस्सी पुन्हा येणार आमने-सामने! सामन्याची तारीखही ठरली

Inter Miami vs Al Nassr: इंटर मियामी आणि अल-नासर या दोन क्लबमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सामना होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
Published on

Lionel Messi vs Cristiano Ronaldo:

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे जगातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. फुटबॉलमधील मानाचा समजला जाणारा बॅलन डी'ओर पुरस्कारही या दोघांनी मिळून तब्बल 13 वेळा जिंकला आहे.

त्यामुळे हे दोघेही जेव्हाही आमने-सामने येतात तेव्हा जवळपास सर्वच फुटबॉल चाहत्यांचे लक्ष त्या सामन्याकडे लागलेले असते. दरम्यान, गेल्या दोन वर्षात हे दोन खेळाडू फारसे आमने-सामने आलेले दिसले नाहीत. पण आता नव्या वर्षात हे दोन खेळाडू अखेरचे आमने-सामने येणार आहेत.

सध्या रोनाल्डो सौदी अरेबियामधील अल-नासर संघाकडून, तर मेस्सी अमेरिकेतील इंटर मियामी क्लबकडून खेळतो. या दोन क्लबमध्ये 1 फेब्रुवारी 2024 रोजी सामना होणार आहे.

Lionel Messi vs Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo: जखमी रोनाल्डोचा तो गोल अन् अल-नासरने जिंकला अरब क्लब चॅम्पियन्स कप

अल-नासर आणि इंटर मियामी संघात रियाध कप स्पर्धेदरम्यान सामना होणार आहे. त्यामुळे इंटर मियामीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा देखील आहे. दरम्यान, इंटर मियामीने काही दिवसांपूर्वीच मेस्सीला आपल्या संघात सामील केले आहे. तर गेल्या वर्षापासून रोनाल्डो अल-नासरकडून खेळत आहे.

इंटर मियामीने माहिती दिली आहे की रियाध सिजन कपमध्ये संघ सौदीमधील अल हिलाल आणि अल नासर या दोन संघांविरुद्ध साखळी फेरीचे सामने खेळणार आहे. हा इंटर मियामीचा प्री-सिजन दौरा असणार आहे.

Lionel Messi vs Cristiano Ronaldo
Messi Video: 'तू जिथे कुठे आहेस मॅराडोना...', आठव्यांदा बॅलन डी'ओर नावावर करताच मेस्सीने मनंही जिंकली

इंटर मियामी आणि सौदी प्रो लीगमधील अव्वल क्रमांकाचा संघ अल-हिलाल यांच्यात 29 जानेवारी 2024 रोजी सामना होईल. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2024 रोजी इंटर मियामी आणि अल-नासर यांच्यात सामना होईल. हे दोन्ही सामने रियाधमधील किंगडम एरिनामध्ये खेळवले जाणार आहेत.

तथापि, असे म्हटले जात आहे की मेस्सी आणि रोनाल्डो या सामन्यातून कारकिर्दीत अखेरचे आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी हे दोघे 35 वेळा आमने-सामने आले आहेत.

यातील 16 वेळा मेस्सीच्या संघाने विजय मिळवला आहे, तर 10 वेळा रोनाल्डोच्या संघाने विजय मिळवला आहे. मेस्सीने 22 गोल आणि 12 असिस्ट केले आहेत, तर रोनाल्डोने 21 गोल आणि 1 असिस्ट केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com