Anuj Rawat: धोनीच्या ऑटोग्राफची जादू? अनुजमध्ये दिसली थालाच्या विकेटकिपिंगची झलक; पाहा Video

Video: अनुज रावतने धोनीची सही असलेले फक्त ग्लव्हज घातले नाही, तर त्याच्यासारखंच रनआऊटंही केलंय.
Anuj Rawat no-look run out
Anuj Rawat no-look run outDainik Gomantak
Published on
Updated on

Anuj Rawat brilliant no-look run out: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात बेंगोलरने तब्बल 112 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बेंगलोरचा यष्टीरक्षक फलंदाज अनुज रावतने त्याच्या यष्टीरक्षण कौशल्याने सर्वांचेच लक्ष वेधले.

या सामन्यात अनुज बेंगलोरकडून दिनेश कार्तिक ऐवजी यष्टीरक्षण करताना दिसला होता. बेंगलोरने राजस्थान समोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाकडून 8 व्या षटकात शिमरॉन हेटमायर आणि आर अश्विन फलंदाजी करत होते.

Anuj Rawat no-look run out
Samantha on MS Dhoni: 'धोनीच्या डोक्यात घुसून...', CSK च्या थालाबद्दल समंथाने दिली अनोखी प्रतिक्रिया

यावेळी हेटमायरने या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑफसाईडला शॉट खेळला. त्यानंतर हेटमायर आणि अश्विनने एक दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण अनुजने मोहम्मद सिराजने थ्रो केलेला चेंडू पकडत मागे न पाहाता थेट स्टंपवर चेंडू फेकला आणि दुसऱ्या धावेसाठी धावत असलेल्या आर अश्विनला धावबाद केले.

त्यामुळे अश्विन एकही चेंडू न खेळता शुन्यावर धावबाद होत माघारी परतला. पण अनुजने दाखवलेल्या चपळाईने सर्वांनीच कौतुक केले. खरंतर अशाप्रकारे स्टंपकडे न पाहाता धावबाद करण्यासाठी एमएस धोनीला ओळखले जाते.

विशेष गोष्ट अशी की अनुज रावतने या सामन्यात यष्टीरक्षण करताना जे ग्लव्हज घातले होते, त्या ग्लव्ह्जवर धोनीची स्वाक्षरीही होती. त्यामुळे सध्या या गोष्टीचीही चर्चा होत असून काही चाहत्यांनी धोनीच्या स्वाक्षरीची जादू असेही म्हटले आहे.

Anuj Rawat no-look run out
MS Dhoni: 'फॅन्सला थँक्यू, कारण...', कॅप्टनकूल पुन्हा निवृत्तीबद्दल बोललाच; ऐकून चाहतेही भावूक

बेंगलोरचा मोठा विजय

दरम्यान, या सामन्यात बेंगलोरने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 59 धावांवरच सर्वबाद झाला. राजस्थानकडून हेटमायरने सर्वाधिक 35 धावा केल्या, तर जो रुटने 10 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.

बेंगलोरकडून वेन पार्नेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच मायकल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

तत्पुर्वी बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके केली होती. डू प्लेसिसने 55 धावांची आणि मॅक्सवेलने 54 धावांची खेळी केली होती. तसेच अनुज रावतने फलंदाजीतही आपले योगदान देताना अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करत 11 चेंडूत नाबाद 29 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे बेंगलोरने 20 षटकात 5 बाद 171 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com