MS Dhoni: 'फॅन्सला थँक्यू, कारण...', कॅप्टनकूल पुन्हा निवृत्तीबद्दल बोललाच; ऐकून चाहतेही भावूक

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीने चाहत्यांचे आभार मानताना निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा दुजोरा दिला आहे.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni Thanks Crowd in Kolkata: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात ईडन गार्डन्स मैदानात सामना झाला. कोलकाताच्या घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईने 49 धावांनी विजय मिळवला.

हा सामना जरी कोलकाताच्या घरच्या मैदानावर झाला असला, तरी या मैदानावर चेन्नईलाही मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून पाठिंबा मिळाला. खरंतर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम आहे. त्याचमुळे चेन्नई संघ यंदा जितक्या मैदानांवर आत्तापर्यंत खेळली आहे, तिथे चेन्नईला आणि धोनीला पाठिंबा देणारे हजारो चाहते उपस्थित असल्याचे दिसले आहेत.

याबद्दल धोनीने कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्याने त्याच्या निवृत्तीचे संकेतही दिले आहेत.

MS Dhoni
MS Dhoni: 'तरीही मला तो पुरस्कार देत नाहीत...', धोनीनं बोलून दाखवली मनातली खंत

धोनी रविवारी झालेल्या सामन्यानंतर म्हणाला, 'मी पाठिंबा देत असलेल्या सर्वांचे आभार मानतो. ते (चाहते) मोठ्या संख्येत आले आहेत. यातील अनेकजण कदाचीत पुढच्यावेळी केकेआरची जर्सी घालून येतील. ते मला निरोप देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे सर्व प्रेक्षकांचे खूप आभार.'

धोनीने हे विधान करत त्याच्या निवृत्तीचे संकेत दिले असल्याने अनेक चाहते भावूक झाले असून याबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे धोनीने या आयपीएल हंगामात खेळताना यापूर्वीही 21 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यानंतरही त्याच्या कारकिर्दीच्या शेवटाबद्दल भाष्य केले होते.

त्यावेळी त्याने म्हटले होते की 'जे काही असेल, हा माझ्या कारकिर्दीतील अखेरचा टप्पा आहे. त्यामुळे त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. इथे छान वाटत आहेत. त्यांनी (चाहत्यांनी) खूप प्रेम आणि आपलेपणा दिला आहे. ते मला ऐकण्यासाठी उशीरापर्यंत थांबतात. मला फलंदाजीसाठी फार संधी मिळत नाही. पण याबद्दल काहीही तक्रार नाही.'

MS Dhoni
MS Dhoni: 'तो जसा टीव्हीवर दिसतो तसा...' CSK च्या स्टार ऑलराउंडरचे धोनीबद्दल मोठे भाष्य

दरम्यान, धोनी आत्तापर्यंत झालेले सर्व आयपीएल हंगाम खेळला आहे. त्याने चेन्नईने खेळलेल्या प्रत्येक हंगामात नेतृत्व करताना चेन्नईला 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे. धोनी आयपीएलमध्ये 200 पेक्षा अधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करणाराही एकमेव खेळाडू आहे.

चेन्नई टॉपला

सध्या आयपीएल 2023 स्पर्धेत 33 सामन्यांनंतर चेन्नई 7 पैकी 5 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. चेन्नई या हंगामात 5 विजय मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com