Will Jacks hits 5 sixes in 5 ball: गुरुवारी (22 जून) इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी20 ब्लास्ट स्पर्धेतील सरे विरुद्ध मिडलसेक्स सामन्यात तुफानी खेळी पाहायला मिळाल्या. दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचा इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्सने वादळी खेळ करताना सलग 5 षटकार मारण्याचा कारनामा केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सरेकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या जॅक्सने 11 व्या षटकात ल्युक होलमनविरुद्ध सलग 5 षटकार मारले. त्याने या षटकाच्या चेंडूवरही षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता.
होलमनने अखेरचा चेंडू फुलटॉस टाकलेला, यावर जॅक्सने सहावा षटकार मारण्यासाठी प्रयत्न केला होता, पण त्याचा फटका चूकला आणि त्याला या सामन्यात फक्त १ धाव काढता आली. त्याला अखेरच्या चेंडूवर एकच धाव काढता आल्याने तो निराशही झाला होता.
जर हा चेंडू देखील षटकारासाठी गेला असता, तर जॅक्सने युवराज सिंग, हर्षेल गिब्स, कायरन पोलार्ड यांसारख्या 6 चेंडूत 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील होऊ शकला असता.
दरम्यान, जॅक्स 15 व्या षटकात बाद झाला. त्याने 45 चेंडूत 96 धावांची खेळी केली. तसेच त्याने सलामीवीर लॉरी इव्हान्सबरोबर 177 धावांची भागीदारी केली. इव्हान्स 37 चेंडूत 85 धावा करून बाद झाला. या दोघांच्या खेळीमुळे सरेने 20 षटकात 7 बाद 252 धावा केल्या होत्या.
पण, मिडलसेक्सने 253 धावांच्या आव्हानाचा पाठलाग 4 चेंडू आणि 7 विकेट्स राखून सहज पूर्ण केला. मिडलसेक्सकडून कर्णधार स्टीफन एस्किनाझीने 13 चौकार आणि 1 षटकारासह 39 चेंडूत 73 धावांची खेळी केली. मॅक्स होल्डेनने 35 चेंडूत 68 धावांची खेळी केली.
तसेच रायन हिगिन्सने 24 चेंडूत 48 धावांची खेळी केली. अखेरीस जॅक डेविसने 3 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 11 धावांची खेळी केली.
आयपीएल 2023 स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने जॅक्सला 3.2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. पण या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेत खेळताना तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला आयपीएलचा हा हंगाम खेळता आला नव्हता.
दरम्यान, जॅक्सने यावर्षी इंग्लंडकडून वनडे, टी20 आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारातून पदार्पण केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.