IND vs PAK: "पाकिस्तान 4-5 दिवसात यूटर्न घेणार'', भारत-पाक हाय-होल्टेज सामन्यावर दिग्गज क्रिकेटरचं मोठं वक्तव्य; पीसीबीलाही सुनावले खडे बोल

Ravichandran Ashwin On IND vs PAK: भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने या वादावर आपले स्पष्ट मत व्यक्त करताना मोठे विधान केले.
Ravichandran Ashwin On IND vs PAK:
Ravichandran Ashwin Dainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup 2026: यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याबाबत सध्या कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला असून क्रीडाविश्वात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला विश्वचषक खेळण्याची परवानगी दिली असली, तरी भारतांविरुद्धच्या सामन्यासाठी अद्याप संमती दिलेली नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या महामुकाबल्याच्या बहिष्काराचे संकेत दिले आहेत.

मात्र, भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने या वादावर आपले स्पष्ट मत व्यक्त करताना मोठे विधान केले. अश्विनच्या मते, पाकिस्तान (Pakistan) लवकरच आपल्या या भूमिकेवरुन माघार घेईल आणि 15 फेब्रुवारीला नियोजित असलेला हा सामना वेळेवरच पार पडेल. आगामी 4-5 दिवसांत पाकिस्तान नक्कीच 'यू-टर्न' घेईल, असा ठाम विश्वास अश्विनने व्यक्त केला.

Ravichandran Ashwin On IND vs PAK:
IND VS PAK: ब्रॉडकास्टर्सकडून पाकवर कायदेशीर कारवाई? आर्थिक कोंडीबरोबर न्यायालयीन कारवाई होण्याची शक्यता

अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना या परिस्थितीच्या आर्थिक परिणामांकडे लक्ष वेधले. त्याच्या मते, भारत-पाकिस्तान हा सामना झाला नाही, तर आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्संना प्रचंड आर्थिक फटका बसेल. हा तोटा केवळ पाकिस्तानलाच नाही, तर आयसीसीच्या इतर पूर्ण सदस्य देशांनाही सहन करावा लागेल.

अशा परिस्थितीत, इतर देशांचा दबाव पाकिस्तानवर वाढेल. जर पाकिस्तानने हट्ट सोडला नाही, तर आयसीसी त्यांच्यावर कठोर कारवाई करु शकते, ज्यामध्ये पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील परदेशी खेळाडूंचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) रद्द करणे यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो. यामुळे पीएसएलच्या भविष्यावरही टांगती तलवार निर्माण होऊ शकते.

Ravichandran Ashwin On IND vs PAK:
IND VS PAK: क्रिकेटचं सर्वात मोठं नुकसान! 2,200,000,000 रुपये पाण्यात; भारत-पाक सामन्याच्या रद्द होण्यानं ICCच्या तिजोरीला भगदाड

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा विश्वचषक आधीच 'हायब्रिड मॉडेल'नुसार खेळवला जात आहे, ज्याला आयसीसी, बीसीसीआय आणि पीसीबी या तिन्हींनी मान्यता दिली आहे. त्यामुळे तटस्थ ठिकाणी खेळताना पाकिस्तानकडे आता तक्रार करण्यासाठी कोणतीही सबब शिल्लक नाही. विशिष्ट प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळण्यास नकार देणे आयसीसीच्या (ICC) नियमात बसणारे नाही, असेही अश्विनने सुनावले.

सध्या पाकिस्तानचा संघ वॉर्म-अप सामन्यांसाठी सज्ज असून ते आपला विश्वचषक प्रवास सुरु करणार आहेत, पण सर्वांचे लक्ष 15 फेब्रुवारीच्या सामन्यावर खिळले आहे. अश्विनने व्यक्त केलेल्या या दाव्यानंतर आता पाकिस्तानचा पुढचा पवित्रा काय असेल, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com