Ranji Trophy: मंथन, एकनाथ, दर्शनमुळे सेनादलावर गोव्याचे वर्चस्व

सेनादलावर 106 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी
Ranji Trophy
Ranji TrophyDainik Gomantak

अवघा दुसराच रणजी करंडक क्रिकेट सामना खेळणाऱ्या डावखुरा मंथन खुटकर याची शैलीदार अर्धशतकी खेळी, तसेच एकनाथ केरकर व कर्णधार दर्शन मिसाळ यांची नाबाद अर्धशतके या बळावर गोव्याने सेनादलावर वर्चस्व राखताना सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर १०६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी संपादन केले.

Ranji Trophy
Crime In Goa: 2022 वर्षात गोव्यात 'किती' गुन्हे दाखल झाले? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

गोवा व सेनादल यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील क गटसाखळी सामना पालम-नवी दिल्ली येथील एअरफोर्स मैदानावर सुरू आहे. बुधवारी खेळ थांबला तेव्हा गोव्याने ५ बाद २८१ धावा केल्या होत्या.

कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या नोंदविलेला एकनाथ ८५, तर मोसमातील चौथे अर्धशतक केलेला दर्शन ५८ धावांवर नाबाद आहे. त्यांनी सहाव्या विकेटसाठी १०८ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यापूर्वी मंथन (८२) व एकनाथने पाचव्या विकेटसाठी ८८ धावा जोडल्या होत्या.

Ranji Trophy
Goa Assembly Session 3rd Day: 'मनोहर', 'पर्रीकर' नावावरून गोंधळ; उद्यापर्यंत सभागृह तहकूब

उपाहारापूर्वी गोव्याची पडझड

गोव्याने सेनादलाच्या १७५ धावांना उत्तर देताना कालच्या १ बाद ३६ वरून डावाला पुढे सुरवात केली. मंथन व सुयश प्रभुदेसाई यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. सुयशला अर्पित गुलेरिया याने पायचीत केल्याने भागीदारी फुटली.

मंथनने संयमी फलंदाजी केली. स्नेहल कवठणकर व सिद्धेश लाड लवकर बाद झाल्यामुळे उपाहाराला गोव्याची ४ बाद १११ अशी स्थिती झाली. पुदुचेरीविरुद्ध दोन्ही डावात शून्यावर बाद झालेला सिद्धेश फक्त आठच धावा करू शकला.

Ranji Trophy
Parra Accident Case: पर्रा-साळगाव येथे दोन दुचाकींची भीषण टक्कर, थिवी येथील एकाचा मृत्यू

पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी

मंथन व एकनाथ यांनी पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करताना सेनादलाच्या गोलंदाजांचे वर्चस्व झुगारून लावले. त्यामुळे गोव्याला आघाडीची संधी प्राप्त झाली.

वैयक्तिक ८२ धावांवर पुलकित नारंगच्या गोलंदाजीवर मंथनने रजत पालिवाल याच्याकडे झेल दिल्यामुळे ८८ धावांची भागीदारी संपुष्टात आली. २३ वर्षीय मंथनने २३१ चेंडूंतील खेळीत आठ चौकार मारले. नंतर एकनाथ व दर्शन यांची जोडी सेनादलास भारी ठरली.

एकनाथने १८० चेंडूंचा सामना करताना ११ चौकारांसह ८५ धावा केल्या असून ५८ धावांवर खेळणाऱ्या दर्शनने ९३ चेंडूंचा सामना करताना आठ चौकार व एका षटकाराची नोंद केली.

संक्षिप्त धावफलक

सेनादल, पहिला डाव: सर्वबाद १७५.

गोवा, पहिला डाव (१ बाद ३६ वरून) : १०८ षटकांत ५ बाद २८१ (मंथन खुटकर ८२, सुयश प्रभुदेसाई २९, स्नेहल कवठणकर ६, सिद्धेश लाड ८, एकनाथ केरकर नाबाद ८५, दर्शन मिसाळ नाबाद ५८, पूनम पुनिया १-३१, अर्पित गुलेरिया १-५३, पुलकित नारंग ३-७७).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com