Bairstow Run-Out: "...त्यापेक्षा स्मार्टनेसचं कौतुक करा", बेअरस्टोच्या वादग्रस्त रनआऊटच्या चर्चेत अश्विनचीही उडी

Ashes 2023: लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत जॉनी बेअरस्टोची विकेट वादग्रस्त ठरली, त्यावर भारताच्या आर अश्विननेही प्रतिक्रिया दिली आहे.
R Ashwin | Jonny Bairstow Run out
R Ashwin | Jonny Bairstow Run outDainik Gomantak

R Ashwin React on Jonny Bairstow Controversial run out: ऑस्ट्रेलियाने रविवारी (2 जुलै) ऍशेस 2023 मालिकेतील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला 43 धावांनी पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, लॉर्ड्स क्रिकेट मैदानानर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत बरेच वाद झाले. त्यातील जॉनी बेअरस्टोच्या धावबादवरून बराच गदारोळ झाला. त्याच्या विकेटबद्दल क्रिकेट विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यात भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विननेही उडी घेतली आहे. अश्विनने बेअरस्टोला बाद करताना ऍलेक्स कॅरेने दाखवलेल्या हुशारीचे कौतुक केले आहे.

R Ashwin | Jonny Bairstow Run out
Bairstow Run-Out: पाय घासून पुढं आला तरी बेअरस्टो रनआऊट कसा झाला? नियम नक्की आहे काय?

का झाला वाद?

या सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून 52 वे षटक टाकणाऱ्या कॅमेरॉन ग्रीनने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. तो चेंडू बेअरस्टोने सोडून दिला. त्यामुळे चेंडू मागे यष्टीरक्षण करणाऱ्या ऍलेक्स कॅरेकडे गेला. पण चेंडू कॅरेकडे गेला तेव्हा बेअरस्टोने फक्त पाय खाली घासला आणि तो पुढे निघून गेला.

त्यावेळी त्याने मागे चेंडू पूर्ण झाला की नाही हे पाहिले नाही. याचा फायदा उचलत कॅरेने चेंडूवर स्टंपवर फेकला. त्यामुळे बेअरस्टोला पंचाकडून 10 धावांवर असताना नियमानुसार बाद देण्यात आले. त्याला याप्रकारे बाद देण्यात आल्याने अनेकांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळभावनेवर टीका केली आहे. तर काहींनी नियम हा नियमच असतो असे म्हटले आहे.

काय म्हणाला अश्विन?

ट्वीटरवर एका युजरने बेअरस्टोच्या धावबादचा व्हिडिओ शेअर करत लिहिले होते की जे लोक कॅरेने केलेल्या कृतीचे कौतुक करत आहेत, त्याच लोकांनी आर अश्विनवर नॉन-स्ट्रायकरला धावबाद करण्याबद्दल टीका केली होती. त्याच युजरच्या ट्वीटला उत्तर देताना अश्विनने बेअरस्टोच्या धावबादबद्दल प्रतिक्रिया दिली.

आपण एक सत्य स्पष्टपणे समजले पाहिजे. "ज्याप्रकारे बेअरस्टोने चेंडू सोडल्यानंतर क्रिज सोडली, त्याचा पॅटर्न यष्टीरक्षक किंवा त्याच्या संघाच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत यष्टीरक्षक कधीही कसोटीत इतक्या दूरून स्टंप उडवणार नाही." आपण काय योग्य किंवा खेळभावनेकडे खेळ झुकवण्यापेक्षा त्या व्यक्तीने दाखवलेल्या हुशारीचे कौतुक करायला हवे.
आर अश्विन, भारतीय फिरकीपटू
R Ashwin | Jonny Bairstow Run out
Lords Ashes Test: वाद संपता संपेना! लॉर्ड्सवर ख्वाजा-वॉर्नर MCC सदस्यांशी भिडले, तिघांचं निलंबन

ऑस्ट्रेलियाने जिंकला सामना

या सामन्यात बेअरस्टो बाद झाल्यानंतरही इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 371 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार खेळ करत शतक केले होते. पण त्याला इंग्लंडला विजय मिळवून देता आला नाही. त्याने 155 धावांची खेळी केली. पण इंग्लंडचा संघ 81.3 षटकात 327 धावांवर सर्वबाद झाला.

दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 100.4 षटकात सर्वबाद 416 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात 76.2 षटकात सर्वबाद 325 धावाच करता आल्या.

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 101.5 षटकात सर्वबाद 279 धावा करता आल्या. तसेच त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या 91 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचे आव्हान ठेवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com