IND vs AUS: नव्या वादाला फुटले तोंड! सिराज, उमरानचा टिळा लावण्यास नकार, Video Viral

सिराज-उमरानसह टीम इंडियाच्या काही सदस्यांनी टिळा लावण्यास नकार दिल्याने नवा वाद उफाळला आहे.
Mohammed Siraj and Umran Malik denied to apply tilak
Mohammed Siraj and Umran Malik denied to apply tilakDainik Gomantak

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका म्हणजेच बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरला होणार आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य नागपूरला पोहचले आहेत.

त्यांचे स्वागत नागपूरमध्ये हॉटेलमधील स्टाफने केले. दरम्यान, काही सदस्यांनी यावेळी टिळा लावण्यास नकार दिला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mohammed Siraj and Umran Malik denied to apply tilak
IND vs AUS: अश्विनचा 'डुब्लिकेट'! कधी काळी विकायचा चहा, आता ऑसींना टीम इंडियाविरुद्ध करतोय मदत; Video

नक्की झाले काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय संघामधील सदस्य हॉटेलमध्ये प्रवेश करत आहेत. यावेळी हॉटेलमधील स्टाफ त्यांचे स्वागत करत आहेत. यातील एक महिला स्टाफ टिळा लावत आहे. त्यावेळी काही सदस्यांनी टिळा लावून घेतला. काहींनी अगदी गॉगल काढून टिळा लावून घेतला.

पण याचवेळी मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांच्याबरोबरच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य हरि प्रसाद मोहन यांनी टिळा लावण्यास नकार दिला.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

सिराज, उमरान, राठोड आणि हरी प्रसाद यांचा टिळा न लावून घेण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजणांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी टिका केली आहे.

काही युजरने म्हटले आहे की सिराज आणि उमरान त्यांच्या धर्माबद्दल खूप कट्टर आहेत, तर काही युजर्सने त्यांना पाठिंबा देत लिहिले आहे की केवळ सिराज, उमरानच नाही, तर राठोड यांच्यासह अजून काही जणांनी टिळा लावण्यास नकार दिलाय, मग इतका वाद कशाला घालायचा. त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करणे चूकीचे आहे.

कसोटी मालिकेवर लक्ष देणे महत्त्वाचे

या व्हिडिओमुळे वाद निर्माण होत असतानाच आता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर लक्ष केंद्रिक करणे महत्त्वाचे असणार आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजवर भारतीय वेगवान गोलंदाजीची सर्वाधिक भिस्त असणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली आहे. या मालिकेतून रविंद्र जडेजासह रोहित शर्माचेही कसोटीसाठी पुनरागमन होणार आहे. रोहित मार्च 2022 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता, तर जडेजा जुलै 2022 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला आहे.

Mohammed Siraj and Umran Malik denied to apply tilak
IND vs AUS: पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची Playing 11 फिक्स! 'या' खेळाडूला मिळणार डच्चू

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी)

9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी - पहिली कसोटी, नागपूर

17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, दिल्ली

1 मार्च ते 5 मार्च - तिसरी कसोटी, धरमशाला

9 मार्च ते 13 मार्च - चौथी कसोटी - अहमदाबाद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com