AUS vs NZ: पॅट कमिन्सचा जलवा! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा ऑस्ट्रेलियन कर्णधार; कपिल देव यांच्या क्लबमध्ये सामील

AUS vs NZ: ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली.
Pat Cummins
Pat CumminsDainik Gomantak

AUS vs NZ: ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली. पॅट कमिन्स आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कसोटीत 100 बळी घेणारा दुसरा कर्णधार बनला आहे. तो आता माजी खेळाडू रिची बेनॉड यांच्या एलिट लिस्टमध्ये सामील झाला आहे. पॅट कमिन्सने किवी संघाविरुद्ध वेलिंग्टनमध्ये ही अनोखी कामगिरी आपल्या नावावर केली. याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 100 बळी घेणारा तो जगातील 10वा कर्णधार ठरला.

कमिन्सने कर्णधार म्हणून कसोटीत 100 बळी पूर्ण केले

दरम्यान, वेलिंग्टनमध्ये दुसऱ्या दिवशी पॅट कमिन्सने डॅरिल मिशेलला बाद करुन ही ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 10 षटकांत 33 धावांत एक विकेट घेत डाव संपवला आणि ऑस्ट्रेलियाने यजमानांना 179 धावांत गुंडाळले. कर्णधार म्हणून 100 विकेट घेणारा रिची बेनॉड यांच्यानंतर आता कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेटमधील दुसरा गोलंदाज ठरला आहे. कर्णधार म्हणून, रिची बेनॉड यांनी ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत एकूण 138 बळी घेतले होते, तर कमिन्सने आता 100 बळी पूर्ण केले आहेत.

Pat Cummins
NZ vs AUS: स्मिथ सलामीसाठी कायम, पहिल्या कसोटीसाठी कर्णधार कमिन्सने जाहीर केली 'प्लेइंग-11'

दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 100 बळी घेणारा पॅट कमिन्स हा 10वा खेळाडू ठरला. याआधी इम्रान खान, कपिल देव, वसीम अक्रम या दिग्गजांनी ही कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज इम्रान खान होते, ज्यांनी एकूण 187 बळी घेतले होते तर रिची बेनॉड 138 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर होते. कपिल देव यांनी कर्णधार म्हणून कसोटीत एकूण 111 बळी घेतले होते, तर वसीम अक्रमने 107 बळी घेतले होते.

Pat Cummins
AUS vs NZ: ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना लय धुतलं; आंतरराष्ट्रीय T20 मध्ये लाजिरवाणा विश्वविक्रम केला नावावर!

कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विकेट्स

इम्रान खान (पाकिस्तान) : 187 विकेट्स

रिची बेनॉड (ऑस्ट्रेलिया) : 138 विकेट्स

गारफिल्ड सोबर्स (वेस्ट इंडिज): 117 विकेट्स

डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड): 116 विकेट्स

कपिल देव (भारत): 111 विकेट्स

वसीम अक्रम (पाकिस्तान) : 107 विकेट्स

बिशनसिंग बेदी (भारत) : 106 विकेट्स

शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका) : 103 विकेट्स

जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) : 100 विकेट्स

पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया): 100 विकेट्स

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com