Pakistan Cricket: 'PCB हिंदूंचा द्वेष करते...' पाक क्रिकेटपटूचे वक्तव्य; BCCI कडे मागितली मदत

Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) सर्व प्रकारचे आरोप होत आहेत. कधी त्याच्या अधिकाऱ्यांवर तर कधी पूर्व कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Pakistan cricket team
Pakistan cricket team Dainik Gomantak
Published on
Updated on

Danish Kaneria On PCB: पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) सर्व प्रकारचे आरोप होत आहेत. कधी त्याच्या अधिकाऱ्यांवर तर कधी पूर्व कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता देशाच्या माजी क्रिकेटपटूने पीसीबीवर हिंदूंचा द्वेष केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियानेही बीसीसीआयकडे मदतीची विनंतीही केली आहे.

दानिश कनेरियाने गंभीर आरोप केले

पाकिस्तानचा माजी गोलंदाज दानिश कनेरिया सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे ठळकपणे चर्चेत असतो. आता त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर आरोप केले आहेत. पीसीबी हिंदूंचा द्वेष करत असल्याचे त्याने म्हटले आहे. कनेरियाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) मदतीचे आवाहन केले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये 'जय श्री राम' आणि 'जय बजरंगबली' असेही लिहिले आहे.

Pakistan cricket team
Pakistan Cricket: शाहीन आफ्रिदीला भरला दम, पाक क्रिकेटमधील गोंधळानंतर नवा फर्मान

पीसीबी हिंदूंचा द्वेष करते

स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या दानिश कनेरियाने (Danish Kaneria) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'पीसीबीने निवड समितीमध्ये आमिर आणि शर्जीलसारख्या फिक्सरला आणेल, ज्यांनी देश विकला कारण ते मुस्लिम आहेत, हिंदू नाहीत... पीसीबी हिंदूंचा द्वेष करते.'

बीसीसीआयकडे मदत मागितली

कनेरिया पुढे लिहिले की, 'हिंदूंना त्यांचे हक्क हवे आहेत. पीसीबीला सांगण्यासाठी बीसीसीआय आम्हाला मदत करेल का? बीसीसीआय आयसीसीला 90 टक्के महसूल देते. जर पाकिस्तान न्याय देऊ शकत नसेल तर बीसीसीआयने विचार करण्याची गरज आहे. जय श्री राम, जय बजरंगबली.'

Pakistan cricket team
Best Cricketer: 2022 च्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या शर्यतीत केवळ एक 'भारतीय', नाव जाणून तुम्ही म्हणाल...

दुसरीकडे, पीसीबीच्या नेतृत्वात अलीकडेच मोठे बदल झाले आहेत. रमीझ राजा यांची हकालपट्टी करुन नजम सेठी यांना पीसीबीचे नवे प्रमुख बनवण्यात आले आहे. याशिवाय, माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या अध्यक्षतेखाली एक नवीन निवड समिती नेमण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com