Para Asian Games 2023:
आशियाई पॅरा क्रीडा 2023 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत आहेत. भारताने दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत (24 ऑक्टोबर) 34 पदके जिंकली होती. दरम्यान, बुधवारी (25 ऑक्टोबर) भारताच्या भालाफेकपटूंनी शानदार कामगिरी केली आहे.
भारताचा पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिलने चीनमधील होंगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा 2023 स्पर्धेत देखील विश्वविक्रमासह सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने आशियाई पॅरा क्रीडा 2023 स्पर्धेमधील भालाफेकमध्ये एफ64 प्रकारात 73.29 मीटर लांब थ्रो करत सुवर्णपदकावर नाव कोरले. हा विश्वविक्रम देखील आहे.
महत्त्वाचे म्हणजे त्याने आपलाच विश्वविक्रम मागे टाकला आहे. त्याने याचवर्षी पॅरिसमध्ये पार पडलेल्या जागतिक पॅरा ऍथलेटिकस चॅम्पियनशीपमध्ये 70.83 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. त्यावेळीही तो त्याचा विश्वविक्रम होता. पण आता हा विक्रम पुन्हा सुमितने मोडला आहे.
दरम्यान, आशियाई पॅरा क्रीडा 2023 स्पर्धेमधील भालाफेकमध्ये एफ64 प्रकारात भारताच्याच पुष्पेंद्र सिंगने 60.06 मीटर भाला फेकत कांस्य पदक जिंकले आहे, तर श्रीलंकेच्या समिता अराचचिगे कोडिखुवाकू 64.09 मीटर भाला फेक करत रौप्य पदक जिंकले.
याबरोबरच पुरुषांच्या भालाफेक एफ37/38 प्रकारातही भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. या प्रकारात भारताच्या हॅनीने हे सुवर्णपदक जिंकून दिले आहे. त्याने 55.97 मीटर थ्रोसह सुवर्णपदकाला गवसणी घातली.
दरम्यान, त्याने 55.97 मीटर थ्रो करत आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतीलही सर्वोत्तम थ्रोचा विक्रम केला. भारताच्या खात्यात आता एकूण 11 सुवर्णपदके झाली आहेत.
तथापि, भारताने पहिल्या दिवशी 17 आणि दुसऱ्या दिवशी 17 पदके जिंकली होती. त्यामुळे भारताकडे दुसऱ्या दिवसाखेपर्यंत 34 पदके होती. दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत भारताकडे 9 सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्य पदके होती. तसेच भारत पदक तालिकेच पाचव्या क्रमांकावर होता. या यादीत भारताच्या पुढे चीन, इराण, जपान आणि उझबेकिस्तान हे देश होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.