India players won 17 medals on 1st Day of Para Asian Games 2023:
आशियाई पॅरा क्रीडा २०२३ स्पर्धेचे उद्धाटन २२ ऑक्टोबर रोजी चीनमध्ये झाले. त्यानंतर भारताने सोमवारी (२३ ऑक्टोबर) पहिल्याच दिवशी पदकांची लयलूट केली आहे. यंदा भारतीय पथकात या स्पर्धेसाठी एकूण ३०३ खेळाडू सामील झाले आहेत.
दरम्यान, भारताने पहिल्याच दिवशी तब्बल १७ पदके जिंकली आहेत. यामध्ये सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच कांस्य पदके जिंकली आहेत. सोमवारी नेमबाज अवनी लेखराची कामगिरी सर्वोत्तम ठरली. तिने महिलांच्या आर२ १० मीटर एअर रायफव स्टँडिंग एसएच१ प्रकारात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सुवर्ण पदक जिंकले. तिने २४९.६ पाँइंट्स मिळवले.
दरम्यान, भारताने सोमवारी मिळवलेल्या १७ पदकांपैकी ११ पदके ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात आली. असे असले तरी पदक तालिकेत अद्याप भारत चौथ्या क्रमांकावर आहे, भारताच्या वर चीन, इराण आणि उझबेकिस्तान आहे.
ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला अंकुर धामाने पुरुषांच्या ५००० मीटर टी-११ प्रकारात सुवर्ण पदक जिंकून दिले, तर निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडी-टी४७ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. याच प्रकारात राम पालने रौप्य पदक जिंकले.
तसेच पुरुषांच्या उंच उडी-टी६३ प्रकारात शैलेश कुमारलाही सुवर्ण पदक मिळाल, तर याच प्रकारात मरियप्पन थांगवेला रौप्य पदक मिळाले. उंच उडीमध्येच टी-६४ प्रकारात भारताच्या प्रविण कुमारला सुवर्ण, तर उन्नी रेनूला कांस्य पदक मिळाले.
मोनू घंगासला पुरुषांच्या गोळा फेक एफ११ प्रकारात कांस्य पदक मिळाले. तसेच पुरुषांच्या क्लब थ्रो-एफ५१ प्रकारात भारतालाच तिन्ही पदके मिळाली, या प्रकारात प्रणव सुरमाने सुवर्ण, धारांबीरने रौप्य आणि अमित कुमारने कांस्य पदक जिंकले.
याशिवाय नेमबाजीत अवनी व्यतिरिक्त रुद्रांश खंडेलवालने रौप्य पदक जिंकले आहे. त्याचबरोबर प्राची यादवने कॅनोएमध्ये महिलांच्या व्हीएल२ प्रकारात रौप्य पदकाला गवसणी घातली.
ज्युडोमध्येही भारताला दोन पदके मिळाली. कपिल परमारने पुरुषांच्या ६० किलो जे१ प्रकारात रौप्य पदक जिंकले, तर महिलांच्या ४८किलो जे२ प्रकारात कांस्य पदक जिंकले. तायकांदोमध्ये महिलांच्या के४४-४७ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.