''आता मग देशात एक आठवड्याची सुट्टी जाहीर करा!'', भारताविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानी PM ट्रोल; नेटकऱ्यांनी घेतलं चांगलंच फैलावर

Shahbaz Sharif Trolled Hong Kong Sixes Win vs India: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतावर मिळवलेल्या या विजयाचा जाहीर आनंद साजरा केला.
Shahbaz Sharif Trolled Hong Kong Sixes Win vs India
Shahbaz Sharif Trolled Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Shahbaz Sharif Trolled Hong Kong Sixes Win vs India: हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने चार गडी राखून विजय मिळवला. हा सामना शुक्रवारी (30 ऑक्टोबर) मोंग कोक येथील मिशन रोड ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकांत 8 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 3.5 षटकांत हे लक्ष्य गाठत सामना जिंकला. हाँगकाँग सिक्सेस ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकृत वेळापत्रकाचा भाग नसून केवळ 6-6 षटकांचा एक साधा सामना आहे. त्यामुळे या विजयाला मुख्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष महत्त्व नाही.

असे असूनही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतावर मिळवलेल्या या विजयाचा जाहीर आनंद साजरा केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये खेळाडूंना आणि पीसीबी अध्यक्षांना या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान स्तरावरुन अशा एका साध्या आणि रँडम टूर्नामेंटमधील विजयाचे कौतुक केल्यामुळे नेटकरी अवाक झाले आणि त्यांनी पाकिस्तानच्या (Pakistan) पंतप्रधानांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

Shahbaz Sharif Trolled Hong Kong Sixes Win vs India
India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार! 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

अनेक युजर्सनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत त्यांची टर उडवली. एका युजरने उपरोधिकपणे लिहिले की, "हाँगकाँग सिक्सेस म्हणजे नक्की काय हे पाहण्यासाठी मला गुगल करावे लागले, हा प्रकार एखाद्या गल्ली क्रिकेटसारखा वाटतो. या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन, आता तुम्ही देशात एक आठवड्याच्या सुट्टीची घोषणा करुन टाका." तर आणखी एकाने टोमणा मारत म्हटले, "जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत भारताला हरवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, हा विजय कोणत्याही वर्ल्ड कप किंवा आशिया कपपेक्षाही मोठा आहे."

Shahbaz Sharif Trolled Hong Kong Sixes Win vs India
Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

एका चाहत्याने तर अशीही प्रतिक्रिया दिली की, "तुम्ही स्वतःच स्वतःला ट्रोल करुन घेत आहात, आता आम्हाला तुम्हाला ट्रोल करण्याची गरजच उरलेली नाही." अशा प्रकारे सोशल मीडियावर या पोस्टची जोरदार चर्चा रंगली असून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चाहत्यांच्या रोषाला आणि खिल्लीला सामोरे जावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.