Pakistan vs New zealand: पाकिस्तानची फायनलमध्ये 'धडक', उपांत्य फेरीतून न्यूझीलंड आऊट

New Zealand vs Pakistan T20 World Cup: उपांत्य फेरीच्या सामन्यात केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
Pakistan
PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

New Zealand vs Pakistan T20 World Cup: T20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह, पाकिस्तान T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, जिथे त्यांचा सामना रविवारी इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.

दरम्यान, न्यूझीलंडने बुधवारी पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत चार बाद 152 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी डॅरिल मिशेलने 35 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या आणि कर्णधार केन विल्यमसनने 42 चेंडूत 46 धावा करत धावसंख्या 150 च्या पुढे नेली. प्रत्युत्तरात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी 75 चेंडूत 105 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. बाबर आझमने 53 आणि मोहम्मद रिझवानने 57 धावा केल्या. पाकिस्तानने 5 चेंडू बाकी असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा करुन सामना जिंकला.

Pakistan
New Zealand दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या 'कर्णधार'

दुसरीकडे, गटात सरासरीच्या कामगिरीनंतर नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरी गाठणाऱ्या पाकिस्तानी संघाचा आजचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्यांच्या फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही शिस्तबद्ध कामगिरी केली. 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान या जोडीने पाकिस्तानला जबरदस्त सुरुवात करुन दिली.

Pakistan
India Tour Of New Zealand: T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर, शेड्यूल जाहीर

तसेच, सुपर-12 च्या चार सामन्यांमध्ये ही जोडी फ्लॉप ठरली होती, परंतु बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) शेवटच्या साखळी सामन्यात बाबर आणि रिझवान यांनी अर्धशतकी भागीदारी केली होती, जी या दोघांनी उपांत्य फेरीतही कायम ठेवली आणि शतकासह संघाचा विजय निश्चित केला. न्यूझीलंडविरुद्ध भागीदारी केली होती. बाबर आझम 42 चेंडूत 53 धावा करुन बाद झाला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा किवी कर्णधार केन विल्यमसनचा निर्णय चुकीचा ठरला आणि पहिल्याच षटकातच आफ्रिदीने त्याला झटका दिला. पहिल्या चेंडूवर फिन ऍलनने आफ्रिदीला चौकार मारला, पण पुढच्याच चेंडूवर ऍलन चुकला आणि मैदानावरील पंचाने त्याला लेग-बिहाइंड घोषित केले.

Pakistan
India vs Pakistan T20 World Cup: भारताने नाणेफेक जिंकली! प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

मात्र, पुढच्याच चेंडूवर आफ्रिदीने त्याच पद्धतीने फिनला लेग बिफोर बाद करुन पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेव्हिड कॉनवेने पुढच्याच षटकात नसीम शाहला दोन चौकार मारुन न्यूझीलंडवरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. हारिस रौफने पहिल्या षटकात केवळ चार धावा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com