अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सध्या भयानक परिस्थिती असून, तालिबानने (Taliban) आफगाणिस्तानवर ताबा मिळविला आहे. त्याचा परिणाम आता सर्व क्षेत्रात दिसत आहे. तेथील क्रीडा क्षेत्रावर देखील परिणाम झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशीच एक बातमी समोर अली आहे, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा खेळाडू झाकी अनवारी (Zaki Anwar, a member of the Afghan national football team) याचा मृत्यू झाला आहे.
तालिबानने कब्जा केल्यानंतर आफगाण नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, तेथे प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी जीव मुठीत धरुन देश सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोक विमानाच्यावर बसून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्नात आहेत. हीच चूक अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटू देखील केली ती त्याच्या जिवावर बेतली आहे. झाकी अनवारी याचा काबूलच्या विमानतळावर अमेरिकेच्या लष्करी विमानावरुन पडून मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रविवारी बंडखोर तालिबान्यांनी आफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देश सोडून जाण्यासाठी अफगाण नागरिकांची विमानतळावर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अनेक जण विमानावर बसले, तर बऱ्याच जणांनी चालत्या विमानात चढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये झाकी अनवारी देखील होता, परंतू त्याचा तोल गेल्याने चालत्या विमानातून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. झाकी अनवारीच्या मृत्यूमुळे संपूर्ण फुटबॉल जगतावर शोककळा पसरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.