Sunil Chhetri Video: 'आई तू बाबा मी होणार...'! सुनील छेत्रीनं अनोखं सेलिब्रेशन करत दिली 'गुडन्यूज'

सुनील छेत्रीने भारतासाठी गोल नोंदवल्यानंतर अनोखं सेलिब्रेशन करत गुडन्यूज दिली आहे.
Sunil Chhetri announces wife's pregnancy
Sunil Chhetri announces wife's pregnancyDainik Gomantak

Sunil Chhetri announces wife's pregnancy: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. नुकताच त्याने भारताकडून वनुआतु संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यातून त्याने सर्वांना तो लवकरच बाबा होणार असल्याचे गुडन्यूज दिली आहे.

ओडिशामधील भुवनेश्वरला हिरो इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारताने वनुआतु संघाला 1-0 असे पराभूत केले. भारताकडून 81 व्या मिनिटाला छेत्रीने गोल केला. हा एकमेव गोल या सामन्यात झाला.

Sunil Chhetri announces wife's pregnancy
FIFA Tribute to Sunil Chhetri: रोनाल्डो, मेस्सीच्या पंक्तीत भारतीय कर्णधार

दरम्यान, हा गोल केल्यानंतर छेत्रीने अनोखे सेलिब्रेशन केले. त्याने बॉल उचलला आणि त्याच्या जर्सीच्या आत टाकत सामना पहायला आलेली त्याची पत्नी सोनम भट्टाचार्यच्या दिशेने फ्लाईंग किस दिले. त्याने त्याच्या या सेलिब्रेशनमधून त्याची पत्नी प्रेग्नंट असल्याचा इशारा केला.

त्याने त्याच्या सेलिब्रेशनबद्दल सामन्यानंतर सांगितले की 'मी आणि माझी पत्नी लवकरच आई-बाबा होणार आहोत. तिची हिच इच्छा होती की मी अशाप्रकारे याची घोषणा करू. हे तिच्यासाठी आणि बाळासाठी होते. मला आशा आहे की आम्हाला आशिर्वाद आणि शुभेच्छा मिळतील.'

Sunil Chhetri announces wife's pregnancy
Goa Football Association: गोवा फुटबॉल संघटनेने आव्हान पेलले; राज्य पातळीवर 14 लीगचे यशस्वी आयोजन

दरम्यान इंटरकॉन्टिनेंटल कपचा हा तिसरा हंगाम आहे. या हंगामाचे आयोजन भारतीय फुटबॉल महासंघाने केले आहे. 2018 साली या स्पर्धेचे आयोजन नेहरु कपच्या जागेवर करण्यात आले होते. भारताने पहिला हंगाम जिंकला होता. त्यानंतर 2019 मध्ये दुसरा हंगाम उत्तर कोरियाने जिंकला होता.

यावर्षी या स्पर्धेत लेबनॉन, वनुआतु आणि मंगोलिया या संघांनी सहभाग घेतला आहे. हे तिन्ही संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर होत असून भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

भारताने मंगोलिया आणि वनुआतुविरुद्ध विजय मिळवला आहे. आता भारताचा सामना 15 जूनला लेबनॉनविरुद्ध होणार आहे. तसेच त्याचदिवशी मंगोलिया आणि वनुआतु संघातही सामना होणार आहे. यानंतर भारताविरुद्ध कोणता संघ अंतिम सामन्यात खेळणार हे निश्चित होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com