Lionel Messi Fan Detained: मैदानात घुसून मेस्सीला भेटणाऱ्या चाहत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; झाली 'ही' कारवाई

अर्जेंटिनाच्या लिओनल मेस्सीला मैदानात घुसून अलिंगन देणाऱ्या चाहत्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Lionel Messi Fan
Lionel Messi FanDainik Gomantak
Published on
Updated on

Lionel Messi Fan Detained: गुरुवारी चीनची राजधानी बिजिंगमध्ये विश्वविजेता संघ अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया संघात मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना झाला. या सामन्यात अर्जेंटिनाने 2-0 असा विजय मिळवला.

या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचीही कामगिरीही चांगली झाली. दरम्यान, या सामन्यात मैदानात घुसणाऱ्या एका चाहत्याने लक्ष वेधले. त्याला ताब्यात घेतले असल्याचेही वृत्त आहे.

Lionel Messi Fan
Lionel Messi to Inter Miami: मेस्सीनं धुडकावली सौदीतील महागडी ऑफर? 'या' अमेरिकन क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज

एक चाहता मोठ्या भिंतीवरून खाली उतरून मैदानात घुसला होता. तो मैदानात घुसल्यानंतर आधी मेस्सीला अलिंगन दिले. त्यानंतर तो संपूर्ण मैदानभर पळत होता. त्यावेळी सुरक्षारक्षक त्याचा पाठलाग करत होते. त्याला पकडण्यासाठी जवळपास ५-६ सुरक्षारक्षक पळत होते.

त्यावेळी त्याने सुरक्षारक्षकांना चकवा देत अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलियानो मार्टिनेजबरोबरही हाय-फाय केले होते. दरम्यान, तो पळताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्यावेळी त्याला सुरक्षारक्षकांनी पकडून बाहेर नेले.

दरम्यान, सुरुवातीला असे समोर आले होते की या चाहत्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. पण नंतर चीनी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार या चाहत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबद्दल चाओयांग जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी सांगितले, 'एक १८ वर्षीय चाहत्याला कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आले आहे.

Lionel Messi Fan
Messi Detained by Chinese Police: मेस्सी विमानतळावर पोहोचताच चिनी पोलिसांनी अडवले, कारणही आले समोर

तसेच त्याला पुढील 12 महिन्यात स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापासूनही रोखण्यात येणार आहे. खेळाचेही नियम असतात आणि खेळ पाहाणाऱ्या फुटबॉल चाहत्यांनाही नियामांचे पालन करावे लागते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा केली जाईल.'

मेस्सीने केला विक्रमी गोल

दरम्यान, या सामन्यात मेस्सीने 81 व्या सेंकदालाच गोल केला होता. त्याने अर्जेंटिनासाठी सलग सातव्या सामन्यात गोल केला आहे, जो एक विक्रम आहे. तसेच हा त्याचा सर्वात वेगवान गोलही ठरला आहे. त्याने आता सुरुवातीचा मिनिट सोडला, तर कारकिर्दीत प्रत्येक मिनिटामध्ये गोल केला आहे.

या सामन्यात मेस्सीव्यतिरिक्त जर्मन पेझेलाने 68 व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी दुसरा गोल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com