जोकोविचचे 2023 मध्ये वर्चस्व! तब्बल सातव्यांदा पटकावले ATP Finals चे विजेतेपद

Novak Djokovic: जोकोविचने एटीपी फायनल्सचे सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे.
Novak Djokovic - Jannik Sinner
Novak Djokovic - Jannik SinnerATP Tours
Published on
Updated on

Novak Djokovic Won seventh ATP Finals title:

सार्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने रविवारी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्याने 19 नोव्हेंबर रोजी सातव्यांदा एटीपी फायनल्सचे विजेतेपद जिंकले आहे. 36 वर्षीय जोकोविचने 22 वर्षांच्या जानिक सिन्नरविरुद्ध टुरिनला झालेल्या अंतिम सामन्यात 6-3, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला.

या विजयासब जोकोविचने यंदाच्या हंगामात आपला दबदबा राखला. त्याने गेल्या वर्षभरात तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकताना 24 विजेतीपदं जिंकली. याशिवाय त्याने आता त्याच्या कारकिर्दीत ४० वे मास्टर्स 1000 विजेतेपदही जिंकले आहे.

Novak Djokovic - Jannik Sinner
Novak Djokovic Fined: जोकोविचला चूकीला माफी नाहीच! विम्बल्डन फायनलमधील पराभवानंतर तब्बल साडेसहा लाखांचा दंड

या विजयानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल जोकोविच म्हणाला, 'गेल्या दोन दिवसात मी अल्कारेज आणि सिन्नर विरुद्ध केलेल्या कामगिरीचा मला खूप अभिमान आहे. ते माझ्या आणि मेदवेदेवच्या समोरील कदाचीत जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. ते ज्याप्रकारे खेळत आहेत, त्यामुळे मला आणखी चांगले खेळावे लागत आहे.'

दरम्यान, या विजयामुळे जोकोविचने पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक भक्कम केला आहे. तो ऐतिहासिक 400व्या आठवड्यात अव्वल क्रमांकावर राहणार आहे.

तसेच यंदाच्या हंगामाबद्दल जोकोविच म्हणाला, 'हा माझ्यासाठी एक उत्तम हंगाम राहिला, यात काही शंकाच नाही. मला हे विजेतेपद स्थानिक हिरो जानिकला हरवल्यानंतर मिळाले आहे. तो खूप चांगले टेनिस खेळला.'

Novak Djokovic - Jannik Sinner
Novak Djokovic vs Carlos Alcaraz: 20 वर्षांच्या अल्कारेजने हरवल्यावर जोकोविच म्हणतोय, 'त्याच्याकडे फेडरर, राफा अन् माझे...'

अंतिम सामन्यात जोकोविचने सुरुवातीच खेळ नियंत्रित करण्यास सुरुवात केली होती. पण त्याला नंतर सिन्नरने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जोकोविचने आपल्या दर्जेदार खेळाने विजयाला गवसणी घातली.

दुहेरीतील विजेतेपद

एटीपी फायनल्समध्ये दुहेरीत राजीव राम आणि जो सालिसबरी यांनी जिंकले. त्यांनी अंतिम सामन्यात 6-3, 6-4 अशा फरकाने मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरासिओ झेबालोस यांना पराभूत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com