IPL 2022 च्या लिलावात 17 वर्षीय मुलगा करणार करोडोंची कमाई!

आता अफगाणिस्तानचा आणखी एक फिरकीपटू आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. नूर अहमद (Noor Ahmad) असे या खेळाडूचे नाव आहे.
Noor Ahmad
Noor AhmadDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या फिरकीपटूंनी आयपीएलमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राशिद खान, मुजीब उर रहमानसारखे खेळाडू आयपीएलमध्ये खेळल्यानंतरच प्रसिद्धीच्या झोतात आले आणि आज ते जगभरातील लीगमध्ये जलवा दाखवत आहेत. या दोघांनी अगदी लहान वयातच आयपीएलसाठी आपली फिरकीचा जलवा दाखवला. आणि आता जगभर प्रसिद्धी मिळवत आहेत. आता अफगाणिस्तानचा (Afghanistan) आणखी एक फिरकीपटू आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. नूर अहमद (Noor Ahmad) असे या खेळाडूचे नाव आहे. मंगळवारी जेव्हा आयपीएल 2022 (IPL 2022) मेगा लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करण्यात आली तेव्हा त्यात नूर अहमदचे नाव होते. तो केवळ 17 वर्षांचा असून यादीतील सर्वात तरुण खेळाडू आहे. (Noor Ahmed Of Afghanistan Has Registered For IPL 2022 Mega Auction)

दरम्यान, या खेळाडूने त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये ठेवली आहे. रशीद आणि मुजीबप्रमाणेच नूरही स्पिनर आहे. नूर हा चायना मॅन गोलंदाज असून सध्या त्याची वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघात निवड झाली होती. हा त्याचा दुसरा अंडर-19 विश्वचषक आहे. याआधी तो 2020 मध्ये अंडर-19 विश्वचषकही खेळला होता आणि तेव्हा तो केवळ 15 वर्षांचा होता.

Noor Ahmad
IPL 2022: एस श्रीसंतने मेगा लिलावासाठी केली नोंदणी

भावाच्या सांगण्यावरुन क्रिकेट अकादमीत गेलो

आयपीएलमध्ये खेळण्यापूर्वी नूर ऑस्ट्रेलियाच्या टी-20 लीग बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सचा भाग होता. बिग बॅश लीग 2020 मध्ये तो मेलबर्नच्या संघाशी निगडीत होता. इम्रान ताहिरच्या बाहेर पडल्यानंतर मेलबर्न रेनेगेड्सने नूरला करारबद्ध केले. भावाची आज्ञा पाळल्यामुळे नूरचे क्रिकेट करिअर सुरु झाले. त्याची गोलंदाजी पाहून त्याच्या भावाने त्याला क्रिकेट अकादमीत सहभागी होण्यास सांगितले. 11 डिसेंबर 2020 रोजीच्या आपल्या अहवालात बीबीसीने नूरचा हवाला देत म्हटले की, “आम्ही राहतो त्या खोस्टमध्ये मी माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळायचो. मी टीव्हीवर राष्ट्रीय संघाचा खेळ पाहायचो आणि एक दिवस मीही खेळेन असे स्वप्न पडायचे.''

तो पुढे म्हणाला, “अनेकांना माझे बॉल खेळताना त्रास व्हायचा. माझ्या एका मोठ्या भावाने मला क्रिकेट अकादमीत जाण्याबद्दल सुचवले. येथून नूरचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर त्याच्या क्रिकेट करिअरला नवी दिशा मिळाली. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने प्रथम श्रेणीत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो अफगाणिस्तानच्या देशांतर्गत टी-20 स्पर्धेतही खेळला.

Noor Ahmad
IPL 2022: लखनऊ सुपर जायंट्सने टीमचा लोगो केला लॉन्च

अंडर-19 विश्वचषकादरमन्यान वादात सापडला

नूर जेव्हा शेवटच्या वेळी म्हणजेच 2020 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये खेळत होता, तेव्हा त्याने पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये असे काही केले होते की, तो वादात सापडला होता.

2020 मध्ये अंडर-19 विश्वचषक आणि बीबीएलमध्ये रंगत आणल्यानंतर, नूरचे पुढील गंतव्य पाकिस्तान सुपर लीग बनले. या लीगमध्ये तो कराची किंग्ज आणि क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळला. इथेही त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना अचंबित केले.

Noor Ahmad
IPL 2022: 'डेव्हिड वॉर्नरला आता आयपीएलमध्ये कोणीही कर्णधार बनवणार नाही'

वयाच्या 14 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सची नजर पडली

2019 मध्ये तो अफगाणिस्तान अंडर-19 संघासोबत भारतात आला होता. त्याने पाच सामन्यांत नऊ विकेट घेतल्या. तेव्हा तो फक्त 14 वर्षांचा होता. यादरम्यान आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) नजर त्याच्यावर पडली. राजस्थाननेही त्याला टेस्टसाठी बोलावले होते. त्याचवर्षी त्याने आयपीएल लिलावासाठी स्वतःची नोंदणीही केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com