IPL 2022: एस श्रीसंतने मेगा लिलावासाठी केली नोंदणी

श्रीशांतने त्याची मूळ किंमत ही तब्बल 50 लाख रुपये ठेवली आहे. बीसीसीआय ने त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घातली होती.
S. Sreesanth
S. SreesanthDainik Gomanatk
Published on
Updated on

12 आणि 13 फेब्रुवारी रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा मेगा लिलाव होणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आसून, मेगा लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये केरळचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतनेही आपली नोंदणी केली आहे. श्रीशांतने त्याची मूळ किंमत ही तब्बल 50 लाख रुपये ठेवली आहे. या मेगा लिलावात एकूण 590 क्रिकेटपटूंवर बोली लावली जाणार असून हा लीलाव दोन दिवस चालणार आहे. आयपीएलच्या होणाऱ्या या 15 व्या हंगामासाठी काही मोठ्या खेळाडूंनीही नोंदणी केली आहे.

S. Sreesanth
IND vs WI: जेसन होल्डर म्हणाला, 'भारताला आम्ही त्यांच्या होम ग्राऊंडवर हरवू'

श्रीशांतने (Sreesanth) 2013 मध्ये शेवटचा आयपीएल सामना राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणा संदर्भात श्रीशांतवर बंदी घालण्यात आली होती. श्रीशांतने 2008 ते 2013 दरम्यान एकूण 44 आयपीएल सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याने 8.14 च्या इकॉनॉमी रेटने धावा देऊन त्याने तब्बल 40 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमधील (Ipl) वादांचा श्रीशांतला मोठा इतिहास आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात श्रीशांत हा पंजाब किंग्जकडून (तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाब) खेळला होता. त्यानंतर एका सामन्यानंतर हरभजन सिंगने त्याला थप्पड सुध्दा मारली होती, ज्यावरून बराच मोठा वाद झाला होता.

यानंतर श्रीशांत स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला. त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घातली होती. सात वर्षांच्या बंदीनंतर श्रीशांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आणि आता त्याला आयपीएलमध्ये परतायचे आहे. आता 10 फ्रँचायझी संघांपैकी कोण श्रीशांतवर बाजी मारतो की नाही हे पाहाने सध्या उत्सुकत्याचे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com