योगासनात गोव्याची ऐतिहासिक कामगिरी, कलात्मक गटात निरल वाडेकरला 'सुवर्ण'

गोव्याने (Goa) योगासनात ऐतिहासिक कामगिरी बजावली. त्यामुळे खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये राज्याला प्रथमच दोन सुवर्णपदकांची कमाई करता आली.
Niral Wadekar
Niral WadekarDainik Gomantak

पणजी: गोव्याने योगासनात ऐतिहासिक कामगिरी बजावली. त्यामुळे खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये राज्याला प्रथमच दोन सुवर्णपदकांची कमाई करता आली. सोमवारी हरियानातील पंचकुला येथे १८ वर्षांखालील मुलींच्या कलात्मक योगासनात नऊ वर्षीय चिमुकल्या निरल वाडेकर हिने सुवर्णपदक प्राप्त केले. सांघिक गटातही ती सोनेरी पदकाची मानकरी ठरली. (Niral Wadekar won a gold medal in the artistic yoga for girls under 18 years of age)

गोव्याच्या मुलींनी कलात्मक योगासनात १८ वर्षांखालील मुलींच्या सांघिक गटातही अव्वल कामगिरी बजावली. या संघात निरल हिच्यासह आश्नी भट सरमळकर, फरझीन झकाती, यशिका चेवली व मनस्वी दास यांचा समावेश होता. गोव्याच्या मुलींनी एकूण १२७.५६ गुण नोंदविले, तर महाराष्ट्राच्या (Maharashtra) संघाला १२६.२९ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तमिळनाडूच्या (Tamil Nadu) मुलींनी ११८.५२ गुण नोंदविले, त्यांना ब्राँझपदक प्राप्त झाले. मुलींच्या सांघिक गटात गोव्याला (Goa) उपविजेतेपद मिळाले. महाराष्ट्राचा संघ सर्वसाधारण विजेता ठरला.

Niral Wadekar
एफसी गोवाचा जेसूराज चेन्नईयीनशी करारबद्ध

चिमुकल्या निरलची कमाल

म्हापसा येथील निरलने कलात्मक योगासनात कमाल केली. तिने अव्वल क्रमांक पटकावताना १३४.२९ गुण नोंदविले. महाराष्ट्राच्या मुलींना अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळाले. प्रांजली व्हाणा हिने १३२.०९ गुण, तर रुद्राक्षी भावे हिने १३१.९ गुणांसह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. निरल महाराष्ट्रातील संगमेश्वर येथे ध्रुव अकादमीत योगविद्येचे प्रगत प्रशिक्षण घेते. ओडिशा येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले होते. राष्ट्रीय स्पर्धेतील पदकामुळे वाईल्ड कार्ड प्रवेशिकेद्वारे निरल हिला खेलो इंडिया यूथ गेम्ससाठी पात्रता मिळाली होती. ही माहिती योगासन स्पोर्टस असोसिएशन ऑफ गोवातर्फे देण्यात आली. तिने निवड सार्थ ठरविताना गोव्यासाठी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. कलात्मक एकेरीतील ११ मुलींत तिने अप्रतिम कौशल्य प्रदर्शित करत वाहव्वा मिळविली.

गोव्याच्या खाती ३ पदके

गोव्याला आता खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये एकूण तीन पदके मिळाली असून तिन्ही योगासनात आहेत. रविवारी तालबद्ध योगासनात मुलींच्या जोडी गटात यशिका चेवली व मनस्वी दास यांनी रौप्यपदकाची कमाई केली होती. एकंदरीत गोव्याला स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्यपदक मिळाले आहे. स्वदेशी खेळ योगासनाचा खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.

Niral Wadekar
तासा गोवा फुटबॉल स्पर्धा: एफसी गोवाचा दणदणीत विजय

२०१८ नंतर प्रथमच सुवर्णपदक

खेलो इंडिया गेम्सला २०१८ साली दिल्लीत सुरवात झाली. त्या वर्षी गोव्यासाठी जलतरणात झेवियर डिसोझाने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०१९ व २०२० मधील यूथ गेम्समध्ये गोव्याला सुवर्णपदक मिळाले नव्हते. चार खेलो इंडिया स्पर्धेत मिळून गोव्याने आता ३९ पदके जिंकली आहेत. त्यात ३ सुवर्ण, १७ रौप्य व १९ ब्राँझपदकांचा समावेश आहे.

Niral Wadekar
गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाचा विजय

क्रीडामंत्री गावडे यांची शाबासकी

गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी पदक विजेत्यांना शाबासकी देताना त्यांचे अभिनंदन केले आहे. क्रीडा संचालक-गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे यांनी पदक विजेत्यांचे कौतुक केले आहे. क्रीडामंत्र्यांनी पदक विजेत्यांप्रती मेहनत घेतलेल्या योगासन संघटना आणि खेळाडूंच्या पालकांनाही यशाचे श्रेय दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com