
Nicholas Pooran Retirement: वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन याने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा निर्णय त्याने वेस्ट इंडिज संघासोबत घेतला असला तरी, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम लागलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होताच, पूरनला मेजर लीग क्रिकेट (MLC) मधील एमआय न्यू यॉर्क (MI New York) संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी एका नवीन पर्वाची सुरुवात झालीये.
निकोलस पूरनने वेस्ट इंडिजसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १६७ सामने खेळले आहेत. यामध्ये सर्वाधिक १०६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो वेस्ट इंडिज संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून निवृत्त झाला, त्याने २,२७५ धावा जमा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी पूरनने आयपीएल २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी धमाकेदार कामगिरी केली होती. या हंगामात त्याने ५२४ धावा फटकावल्या, ज्यात त्याचा स्ट्राइक रेट १९६.२५ इतका स्फोटक होता. या खेळींमध्ये त्याने पाच अर्धशतकेही झळकावली होती, ज्यामुळे त्याची 'फॉर्मिडेबल हिटर' अशी ओळख आणखी मजबूत झाली.
एमआय न्यू यॉर्कने पूरनची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्याचा कर्णधारपदाचा अनुभव आणि खेळण्याचे कौशल्य संघासाठी फायदेशीर ठरेल अशी त्यांना अपेक्षा आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे आणि जगभरातील टी-२० लीगमध्ये मिळालेल्या सखोल अनुभवामुळे तो आगामी हंगामात संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू ठरण्याची अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.