IPL 2025: पहिला सामना हरला की 'ट्रॉफी' पक्की, Mumbai Indians इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

IPL 2025 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने यंदा अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. नव्या चेहऱ्यांना घेऊन संघाने आपली ताकद आणखीनचं मजबूत केली आहे.
IPL 2025 Mumbai Indians
IPL 2025 Mumbai IndiansDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Indians

आयपीएल 2025 चा थरार सध्या शिगेला पोहोचला असून सर्वच क्रिकेट प्रेमींचं लक्ष अंतिम विजेत्या संघाकडे लागलेलं आहे. अनेक संघ सध्या टॅाप-४ मध्ये राण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत असले, तरी एक संघ मात्र पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, तो म्हणजे 'मुंबई इंडियन्स'.

मुंबईने यंदाही आपली पारंपरिक शैली कायम ठेवली आहे. मुंबईने सुरूवातीचे काही सामने गमावलेत, मात्र नंतर पुनरागमन केलं. पहिला सामना गमावल्यानंतर अनेकांनी या संघावरील आशा सोडून दिल्या होत्या. मात्र, इतिहासाकडे डोकावलं तर लक्षात येतं की मुंबई इंडियन्सने ज्या-ज्या वेळेस पहिला सामना हरवला आहे, त्या वेळेस त्यांनी स्पर्धेचा चषक आपल्या नावे केला आहे.

IPL 2025 Mumbai Indians
Goa: गोव्यातील 2 गावे होणार Model Solar Village! सौर ऊर्जेने होणार प्रकाशित; 48 गावांचे सर्वेक्षण

2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या सर्वच वर्षांत मुंबईने पहिल्या काही सामन्यांमध्ये अपयशाचा सामना केला. पण त्या अपयशातून शिकत त्यांनी जबरदस्त पुनरागमन केलं आणि शेवटी जेतेपदावर नाव कोरलं. यंदाही त्यांनी सुरुवातीस संघर्ष केला, काही सामने गमावले, मात्र आता संघ ज्या पद्धतीने पुन्हा चांगल्या लयीत आला आहे, ते पाहता इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता प्रबळ वाटते.

मुंबई इंडियन्सने यंदा अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. नव्या चेहऱ्यांना घेऊन संघाने आपली ताकद आणखीनचं मजबूत केली आहे. यामुळे एकूणच टीमचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो.

मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा पहिला संघ आहे. मात्र गेल्या काही हंगामांमध्ये या संघाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र, यंदाच्या हंगामात त्यांनी नवी उमेदीने हा संघे खेळताना पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सने पहिले काही सामने वगळता नंतरच्या सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत गुणतालिकेत आपलं स्थान बळकट केलं आहे. सध्याच्या फॉर्मनुसार ते प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे प्रबळ दावेदार आहेत.

IPL 2025 Mumbai Indians
Goa Stampede: '..अजूनही धोंड भक्तगणांचा आरडाओरडा ऐकू येत आहे'! लईराई दुर्घटनेतील प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणे कठीण असलं, तरी आकडेवारी आणि इतिहासावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ‘मुंबई इंडियन्स’ हे यंदाचे प्रबळ दावेदार ठरत आहेत. पुढील काही सामन्यांमध्ये या संघाची कामगिरी कशी राहते, यावर संपूर्ण स्पर्धेचं चित्र स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com