
आयपीएल २०२५ मध्ये, मुंबई इंडियन्स संघानं सुरुवातीचे काही सामने गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करत सलग पाच सामने जिंकले. मुंबई सध्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी त्यांचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला, जिथे मुंबईने ५४ धावांनी विजय मिळवला.
मुंबई इंडियन्स संघाने या विजयासह आयपीएलमध्ये एक नवा विक्रम रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात १५० सामने जिंकणारा हा पहिला संघ ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ संघ कोणते आहेत? यावर एक नजर टाकूया.
आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने इतिहास रचला. मुंबई संघ आयपीएलमध्ये १५० सामने जिंकणारा पहिला संघ बनला आहे. पाच वेळा विजेत्या मुंबईने २७१ पैकी १४८ सामने जिंकले आहेत. तर सुपर ओव्हरमध्ये दोन सामने जिंकले आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज आहे. आयपीएलमध्ये सीएसकेने २४८ पैकी १४० सामने जिंकले आहेत.
तीन वेळा आयपीएल चॅम्पियन असलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत २६१ सामने खेळले आहेत ज्यापैकी १३३ सामने जिंकले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीने २६६ पैकी १२८ सामने जिंकले आहेत. संघात अनेक स्टार खेळाडू असूनही, या फ्रँचायझीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही.
या यादीत दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या क्रमांकावर आहे. डीसीने आतापर्यंत आयपीएलमध्ये २६१ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी ११७ सामने जिंकले आहेत. दिल्लीला आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.