AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Nic Madinson Duck Against South Africa: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डर्बनच्या किंग्समीड मैदानात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्मिळ आणि नकोसा विक्रम पाहायला मिळाला.
Nic Madinson Duck Against South Africa
Nic Madinson Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Nic Madinson Duck Against South Africa: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डर्बनच्या किंग्समीड मैदानात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्मिळ आणि नकोसा विक्रम पाहायला मिळाला. तब्बल एका दशकभराने कसोटी संघात पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियन सलामीवीर निक मॅडिनसन याच्यासाठी हे पुनरागमन अत्यंत निराशाजनक ठरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मॅडिनसनला तब्बल 33 चेंडूंचा सामना करुनही आपले खाते उघडता आले नाही आणि तो शून्य धावांवर बाद झाला. या खराब कामगिरीमुळे त्याच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाकडून ट्रॅव्हिस हेड आणि निक मॅडिनसन यांनी डावाची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि हेड अवघ्या 9 धावा काढून माघारी परतला. यानंतर दीर्घ प्रतिक्षेनंतर कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) पुनरागमन करणाऱ्या मॅडिनसनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु त्याने 33 चेंडू खेळूनही एकही धाव न काढता पॅव्हेलियनचा रस्ता धरला. मार्को यानसेनच्या गोलंदाजीवर कट शॉट खेळण्याच्या नादात तो आऊट झाला.

Nic Madinson Duck Against South Africa
IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

या 33 चेंडूंसह मॅडिनसन कसोटी इतिहासात सर्वाधिक चेंडू खेळून शून्य धावांवर बाद होणारा तिसरा सलामीवीर ठरला. विशेष म्हणजे, 21व्या शतकातील कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही सलामीवीराद्वारे शून्य धावांवर खेळली गेलेली ही सर्वात लांब अनपेक्षित खेळी ठरली. कसोटी क्रिकेटमध्ये खाते न उघडता सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या डॅरेन मरे याच्या नावावर आहे, ज्याने 1995 मध्ये 39 चेंडू खेळूनही खाते उघडले नव्हते.

Nic Madinson Duck Against South Africa
AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

34 वर्षीय निक मॅडिनसनला दुखापतग्रस्त कॅमेरुन ग्रीनच्या जागी संघात स्थान मिळाले. तो कर्करोगाशी यशस्वी लढा देऊन दीर्घ विश्रांतीनंतर कसोटी संघात परतला. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी कसोटी सामना 2016 मध्ये मेलबर्न येथे पाकिस्तानविरुद्ध खेळला. 2016-17च्या देशांतर्गत हंगामात त्याने तीन सामन्यांत केवळ 27 धावा केल्या, त्यामुळे त्याच्या निवडीवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने त्याच्या निवडीवरुन टीकाही केली, मात्र कर्णधार पॅट कमिन्सने त्याचे समर्थन केले. आता मॅडिनसनच्या समोर दुसऱ्या डावात स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com