Harry Brook
Harry Brook Dainik Gomantak

Harry Brook: 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात 'हा' रेकॉर्ड करणारा ब्रुक पहिलाच, भारताच्या कांबळीलाही पछाडलं

इंग्लंडच्या 24 वर्षीय हॅरी ब्रुकने 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात कोणालाचा न जमलेला विश्वविक्रम नावावर केला आहे.
Published on

New Zealand vs England: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघात वेलिंग्टन येथे 24 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा 24 वर्षीय फलंदाज हॅरी ब्रुकने इतिहास रचला आहे. त्याने जो रुटबरोबर शानदार फलंदाजी करताना शतकी खेळी केली. याबरोबर मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली.

त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात आक्रमक फलंदाजी करताना 176 चेंडूत 24 चौकार आणि 5 षटकारांसह 186 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने कसोटी कारकिर्दीत 800 धावांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे या 800 धावा ब्रुकने केवळ 6 वा कसोटी सामना खेळताना अवघ्या 9 व्या डावात पूर्ण केल्या आहेत.

त्यामुळे जवळपास 145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका फलंदाजाने केवळ 9 डावात 800 धावांचा टप्पा पार करण्याचा कारनामा केला आहे. ब्रुकच्या आता 9 डावात 809 धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

Harry Brook
Harmanpreet Kaur: 'देशाने मला असं पाहू नये म्हणून...' T20 WC सेमीफायनलमधील पराभवानंतर कर्णधार इमोशनल

यासह त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिल्या 9 डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. कांबळीने 1993-94 सालादरम्यान त्याच्या पहिल्या 9 कसोटी डावात 798 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा समावेश होता. विशेष म्हणजे या 4 शतकांपैकी दोनवेळा त्याने 200 धावांचा आकडा पार केला होता.

दरम्यान, वेलिंग्टन कसोटीत ब्रुक ज्यावेळी फलंदाजीसाठी आला होता, त्यावेळी इंग्लंड संघाने 21 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत जो रुटला दमदार साथ दिली. रुट आणि ब्रुक यांच्यात चौथ्या विकेटसाठी 302 धावांची भागीदारी झाली. अखेर 68 व्या षटकात मॅट हेन्रीने स्वत:च्याच गोलंदाजीवर ब्रुकचा झेल घेत ही भागीदारी तोडली.

Harry Brook
Women's T20 World Cup: इंग्लंडचा स्वप्नभंग! यजमान दक्षिण अफ्रिका पहिल्यांदाच फायनलमध्ये

या डावात जो रुटनेही त्याचे 29 वे कसोटी शतक पूर्ण केले. इंग्लंडने त्यांचा पहिला डाव 87.1 षटकात 8 बाद 435 धावांवर घोषित केला. यावेळी रुटने 224 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 153 धावा केल्या होत्या.

यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा न्यूझीलंडने पहिल्या डावात 7 बाद 138 धावा केल्या आहेत. ते अद्याप 297 धावांनी पिछाडीवर आहेत.

कारकिर्दीतील पहिल्या 9 कसोटी डावांनंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

807 धावा - हॅरी ब्रुक

798 धावा - विनोद कांबळी

780 धावा - हर्बर्ट सटक्लिफ

778 धावा - सुनील गावसकर

777 धावा - इव्हर्टन विक्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com