Neeraj Chopra करणार दोहा डायमंड लीगच्या हंगामाची सुरुवात, चॅम्पियन 90 मीटरचा टप्पा...

Olympic champion Neeraj Chopra: ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा येत्या 5 मे रोजी दोहा येथे होणाऱ्या डायमंड लीगमध्ये सहभागी होणार आहे.
Neeraj Chopra
Neeraj ChopraDainik Gomantak
Published on
Updated on

Olympic champion Neeraj Chopra: ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा येत्या 5 मे रोजी दोहा येथे होणाऱ्या डायमंड लीगमध्ये सहभागी होणार आहे.

गेल्या सप्टेंबरमध्ये ग्रँड फिनाले जिंकल्यानंतर डायमंड लीगचा चॅम्पियन असलेला चोप्रा, ग्रेनेडाचा वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्स आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलजेचबरोबर 14-लेग वन-डे सीरीजमध्ये सामील होईल.

नीरज चोप्राची (Neeraj Chopra) वैयक्तिक सर्वोत्कृष्ट 89.94m आहे, जी त्याने गेल्या वर्षी स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान मिळवताना मिळवली. सध्या तो तुर्किये येथे प्रशिक्षण घेत आहे. चोप्रा 31 मे पर्यंत तिथे असेल.

भारतीय सुपरस्टार दोहा डायमंड लीगला मुकला

दुखापतीमुळे भारतीय सुपरस्टार निरज चोप्रा 2022 दोहा डायमंड लीगला मुकला होता. जिथे पीटर्सने 93.07 मीटर भालाफेक करुन विजेतेपद पटकावले होते.

इतिहासातील हा पाचवा सर्वात लांब थ्रो होता. जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या वडलेचने 90.88 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोसह दुसरे स्थान पटकावले होते.

Neeraj Chopra
Neeraj Chopra Video: जेव्हा 'गोल्डन बॉय'ही पंजाबी गाण्यावर धरतो ठेका..., डान्स पाहून व्हाल थक्क

हे खेळाडूही दिसतील

दोहा युरोपियन चॅम्पियन जर्मनीचा ज्युलियन वेबर, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा माजी ऑलिम्पिक चॅम्पियन केशोर्न वॉल्कोट आणि केनियाचा ज्युलियस येगो हे तिघेही सहभागी होणार आहेत.

ट्रॅक अँड फील्डमधील पहिले भारतीय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता चोप्राला यंदा भालाफेकमध्ये 90 मीटरचा टप्पा पार करावा लागणार आहे.

Neeraj Chopra
Neeraj Chopra Injury: भारताच्या आशांना मोठा धक्का, नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

90 मीटरचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य

तो म्हणाला- 'मी देखील 90 मीटरच्या जवळ जात आहे, त्यामुळे तो अडथळा पार करणे माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असेल.

गेल्या वर्षी जागतिक रौप्य पदक आणि वांडा डायमंड लीग विजयाचे वर्ष होते, आता हे वर्ष नवीन संधी घेऊन आले आहे. या उन्हाळ्यात माझे लक्ष्य आशियाई गेम तसेच जागतिक स्पर्धा हे आहे.' 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास रचल्यानंतर चोप्रा यूएसएमध्ये 2022 च्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकेल होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com