Neeraj Chopra Video: जेव्हा 'गोल्डन बॉय'ही पंजाबी गाण्यावर धरतो ठेका..., डान्स पाहून व्हाल थक्क

नीरज चोप्राचा 'बिजली बिजली' गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Neeraj Chopra
Neeraj ChopraDainik Gomantak
Published on
Updated on

Neeraj Chopra dance: मुंबईत नुकताच इंडिया स्पोर्ट्स ऑनर्स पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक भारतातील अनेक स्टार खेळाडू आणि सेलिब्रेटी सहभागी झाले होते. यामध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचाही समावेश होता.

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक नीरज चोप्राने या सोहळ्याचा भरपूर आनंदही लुटल्याचे दिसून आले. या सोहळ्यादरम्यान नीरजने काही सेलिब्रेटींबरोबर डान्सही केला. त्याचा डान्सचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Neeraj Chopra
Neeraj Chopra: नवीन वर्षात गोल्डन बॉयसमोर असणार 'हे' लक्ष्य

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की या सोहळ्यावेळी 'बिजली बिजली' या हर्डी संधूच्या पंजाबी गाण्यांवर त्याने डान्स केला. त्याच्याबरोबर यावेळी रुही दोसानी, यशराज मुखटे आणि दिपराज जाधव हे प्रसिद्ध कटेंट क्रिएटर देखील डान्स करत होते. त्यांच्या डान्सच्या व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्सही केल्या असून अनेकांनी नीरजच्या डान्सचे कौतुक केले आहे.

नीरज हा भारताचा ट्रॅक अँड फिल्ड या प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा पहिलाच खेळाडू आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. नीरजला आत्तापर्यंत पद्मश्री, मेजर ध्यानचंक खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार असे काही मानाचे पुरस्कारही मिळाले आहे.

Neeraj Chopra
Olympic आयोजनाचा भारत प्रबळ दावेदार, मोदींचे गृहराज्य करणार होस्ट; क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती

सोहळ्यासाठी दिग्गजांची हजेरी

या पुरस्कार सोहळ्यासाठी विराट कोहली-अनुष्का शर्मा, रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, अंगद बेदी-नेहा धुपिया, अभिषेक बच्चन, अजय देवगन यांसारखे सेलिब्रेटी, तसेच पीआर श्रीजेश, योगेश्वर दत्त, विजेंदर सिंग, पीटी उषा, शुभमन गिल असे अनेक खेळाडूही उपस्थित होते.

या सोहळ्यात 1 जानेवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत चांगली कामगिरी करणाऱ्य खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com