Ashes 2023: तिसऱ्या ऍशेस कसोटीतून ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन बाहेर, इंग्लंड संघातही मोठा बदल

Ashes 2023: तिसऱ्या ऍशेस कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांची घोषणा करण्यात आली आहे.
England vs Australia
England vs AustraliaDainik Gomantak

England and Australia Squad for 3rd Ashes Test 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या ऍशेस मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्लेला होणार आहे. हा सामना 6 जुलैला सुरू होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांची घोषणा झाली असून दोन्ही संघात काही बदल झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा धक्का

लॉर्ड्सला झालेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या पायाच्या पोटऱ्यांचे स्नायू दुखावले गेले आहेत. त्यामुळे तो उर्वरित ऍशेस 2023 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाने युवा टॉड मर्फीवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे फिरकीपटू म्हणून मर्फी तिसऱ्या कसोटीत खेळताना दिसू शकतो.

England vs Australia
Bairstow Run-Out: पाय घासून पुढं आला तरी बेअरस्टो रनआऊट कसा झाला? नियम नक्की आहे काय?

याशिवाय ऑस्ट्रेलियाने पर्यायी फलंदाज म्हणून संघात असलेल्या मॅथ्यू रेनशॉ यालाही संघातून मुक्त केले आहे. पण तो इंग्लंडमध्येच थांबणार आहे. याशिवाय बॅकअप वेगवान गोलंदाज मायकल नेसेर आणि बॅकअप यष्टीरक्षक जिमी पिअर्सन हे संघात कायम आहेत.

इंग्लंड संघातही बदल

इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी मोठा बदल केला नसला, तरी त्यांना काही खेळाडूंच्या फिटनेसची चिंता सतावत आहे. सलामीवीर ऑली पोपच्या खांद्याचे स्कॅन केले जाणार आहे. त्याच्या खांद्याला लॉर्ड्स कसोटी दरम्यान दुखापत झाली होती. तसेच मोईन अलीच्याही बोटाला पहिल्या कसोटी दरम्यान दुखारत झाली होती, त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळला नव्हता.

त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीपूर्वी पूर्ण बरा व्हावा अशी इंग्लंडची इच्छा असेल. दरम्यान, त्याच्याऐवजी दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात सामील करण्यात आलेल्या रेहान अहमदला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. याशिवाय ख्रिस वोक्स आणि मार्क वूड संघात कायम आहेत.

England vs Australia
Lords Ashes Test: वाद संपता संपेना! लॉर्ड्सवर ख्वाजा-वॉर्नर MCC सदस्यांशी भिडले, तिघांचं निलंबन

ऑस्ट्रेलियाला ऍशेस जिंकण्याची संधी

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन्ही कसोटीत विजय मिळवला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ सध्या ५ कसोटी सामन्यांच्या या ऍशेस मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे आगामी तिन्ही कसोटीतील एकाही सामन्यात विजय मिळवला, तरी ऑस्ट्रेलिया यंदाच्या ऍशेस मालिकेत विजय निश्चित करेल.

तिसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ

ऑस्ट्रेलिया - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मायकेल नेसर, जिमी पीअर्सन (यष्टीरक्षक), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

इंग्लंड - बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टंग, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com