IND vs AUS: 'ते' स्वप्न अजून पूर्ण करायचंय, 100 व्या कसोटीपूर्वी पुजाराने व्यक्त केली अपूर्ण इच्छा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीमध्ये होणारा कसोटी सामना चेतेश्वर पुजाराचा 100 वा कसोटी सामना असणार आहे.
Cheteshwar Pujara
Cheteshwar PujaraDainik Gomantak
Published on
Updated on

Cheteshwar Pujara: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील दुसरा सामना 17 मार्चपासून सुरू होणार आहे. हा सामना भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराचा 100 वा कसोटी सामना असणार आहे. हा सामना खेळण्यापूर्वी त्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पुजाराने 100 व्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्याला कसोटी चॅम्पियनशीप जिंकण्याची इच्छा असल्याचेही सांगितले. साल 2010 मध्ये पुजाराने कसोटीत पदार्पण केल होते.

दरम्यान पुजारा म्हणाला, 'जेव्हा मी कसोटी पदार्पण केले होते, त्यावेळी मी विचार केला नव्हता की मला 100 कसोटी खेळण्याची संधी मिळेल. मी नेहमीच वर्तमानकाळात रहाणे आणि फार पुढचा विचार न करण्याला प्राधान्य देतो.'

'त्यामुळे मी जेव्हा ही मालिका सुरू व्हायच्या आधी विचार करत होतो, त्याचवेळी मला अचानक जाणीव झाली की मी 100 वी कसोटी खेळणार आहे. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही नेहमीच चढ-उतार येत असतात आणि तुम्हाला त्या काळात लढावे लागते.'

Cheteshwar Pujara
IND vs AUS: पुजारा करणार कांगारुंचा काटा लॉक, 100 व्या कसोटीत...

भारताकडून 100 कसोटी खेळणारा 13 वा खेळाडू बनण्याची संधी असलेला पुजारा पुढे म्हणाला, 'अजून मिळवण्यासाठी खूप काही आहे. मी नक्कीच समाधानी आहे आणि १०० वी कसोटी खेळण्यास उत्सुक आहे. पण त्याचवेळी आम्ही खूप महत्त्वाची मालिका खेळत आहोत. त्यामुळे आशा आहे की आपण हा कसोटी सामना जिंकू आणि आणखी एका विजयासह कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचू.'

'माझे स्वप्न आहे की मला भारतीय संघासाठी कसोटी चॅम्पियनशीप जिंकायची आहे. गेल्या पर्वात ते स्वप्न अधूरे राहिले होते. पण आशा आहे की आम्ही अंतिम सामन्यासाठी पात्र ठरू.' भारताचा कसोटी चॅम्पियनशीप 2023 अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 किंवा 3-0 अशा फरकाने विजय आवश्यक आहे,

याशिवाय पुजाराने त्याच्या कुटुंबाप्रती, मित्रपरिवाराबद्दल आणि प्रशिक्षकांबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. त्याने विशेषत: त्याच्या वडिलांबद्दल ऋणभाव व्यक्त केले. पुजाराला क्रिकेटपटू म्हणून घडवण्यात त्याच्या वडिलांचा वाटा मोठा आहे. महत्त्वाचे म्हणजे पुजाराच्या 100 व्या कसोटीसाठी त्याचे वडील आणि पत्नी स्टेडियममध्ये उपस्थित असणार आहे.

Cheteshwar Pujara
लहानपणी पंतगही उडवता न आलेल्या Cheteshwar Pujara बद्दल 'या' गोष्ट माहितीये का?

तसेच पुजाराला त्याच्या संयमी स्वभावाबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'संयम आपोआप तुमच्यात येत नाही, तुम्हाला त्यासाठी मानसिकरित्या मजबूत असणे महत्त्वाचे असते. सराव करत रहाणे महत्त्वाचे आहे. मी ज्यूनियर स्तरावर, वयोगटातील क्रिकेटमध्येही धावा केल्या. तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. मला वाटते की जेव्हा तुम्ही तुमच्या खेळावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही यशस्वी होता.'

त्याचबरोबर त्याच्या आवडत्या खेळीबद्दलच्या प्रश्नावर उत्तर देताना पुजारा म्हणाला, 'माझी आवडती खेळी ही माझ्या पदार्पणातील आहे, ज्या सामन्यात मी 72 धावा केल्या होत्या. ती माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची खेळी होती. 2017 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरु कसोटीतील खेळी (97 धावा), दक्षिण आफ्रिकेतील माझे पहिले परदेशातील शतक, ऍडलेडला केलेली 124 धावांची खेळी आणि गॅबावर 2021 मध्ये केलेली खेळी, या काही माझ्या आवडत्या खेळी आहेत.'

पुजाराने त्याच्या कसोटी कारकिर्दीत आत्तापर्यंत 99 कसोटी सामन्यांत 44/15 च्या सरासरीने 7021 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com