

Mumbai Indians Captaincy Rumours: आयपीएल 2027च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची साथ सोडणार हे जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. याचदरम्यान हिटमॅनच्या फॅन्ससाठी एक दिलासादायक बातमी आली होती की, मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवणार आहे. मात्र आता मुंबई इंडियन्सने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला. कर्णधारपदाबाबत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला (Rohit Sharma) पुन्हा कर्णधार बनवण्याच्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. पुढील हंगामासाठी कर्णधारपदाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. जर हार्दिक पांड्याने संघ सोडला, तर मुंबईकडे रोहितव्यतिरिक्त इतरही अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. या शर्यतीत सूर्यकुमार यादव आणि स्टार फलंदाज तिलक वर्मा सर्वात अग्रेसर आहेत. याशिवाय न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरही शर्यतीत आहे.
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याकडे मुंबईचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. परंतु संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर हार्दिक आणि मॅनेजमेंटमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे हार्दिकने संघ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सध्या मुंबई इंडियन्स हार्दिकच्या ट्रेडसाठी चांगल्या डील्स शोधत आहे. योग्य ऑफर मिळताच याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
गेला हंगाम मुंबईसाठी अजिबात चांगला राहिला नव्हता. त्यामुळे संघात काही महत्त्वाचे बदल केले जातील. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्व संघांना आपली रिटेंशन लिस्ट जाहीर करावी लागणार आहे. त्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिनी लिलाव पार पडणार आहे. त्यापूर्वी हार्दिक पांड्याबाबतचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. मुंबई इंडियन्स लिलावातून मजबूत संघ तयार करण्याच्या तयारीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.