ठरलं तर! नेमारचा संघ मुंबई सिटीविरुद्ध भारतात खेळणार, AFC Champions League चे ड्रॉ जाहीर

Mumbai City FC: एएफसी चॅम्पियन्स लीग ग्रुप स्टेजचे ड्रॉ निश्चित झाले असून मुंबई सिटी एफसीही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.
Neymar | Mumbai City FC
Neymar | Mumbai City FCDainik Gomantak

Mumbai City FC drawn alongside Neymar's Al Hilal:

इंडियन सुपर लीग (ISL) शिल्ड जिंकणारा मुंबई सिटी एफसी संघ 2023-24 च्या एएफसी चॅम्पियन्स लीग (AFC Champions League) स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. एएफसी चॅम्पियन्स लीग आशियातील प्रतिष्ठीत स्पर्धा समजली जाते.

या स्पर्धेच्या ग्रुप स्टेजसाठीचे ड्रॉ गुरुवारी (24 ऑगस्ट) क्वालालंपुरमध्ये निश्चित करण्यात आले. या ड्रॉमध्ये वेस्ट झोनमधील ग्रुप डीमध्ये देस बकिंगघम मॅनेजर असलेल्या मुंबई सिटी एफसीला ग्रुप डीमध्ये स्थान मिळाले आहे.

याच ग्रुपमध्ये सौदी अरेबियातील अल हिलाल क्लबचाही समावेश झाला आहे. या क्लबने काही दिवसांपूर्वीच ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार ज्युनियरबरोबर करार केला आहे. त्यामुळे आता नेमार भारतात खेळताना दिसू शकतो.

Neymar | Mumbai City FC
Durand Football Cup: एफसी गोवा संघाला खुणावतेय बाद फेरी, शनिवारचा सामना ठरणार निर्णायक

दरम्यान मुंबई सिटी एफसी आणि अल हिलाल यांच्या व्यतिरिक्त इराणचा एफसी नासाजी मझांदरान आणि उझबेकिस्तानचा पीएफसी नवबाहोर नमांगन या क्लबचा समावेश आहे.

भारतातून एकमेव मुंबई सिटी एफसी क्लब एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. दरम्यान ही स्पर्धा सप्टेंबर 2023 ते मे 2024 दरम्यान होणार आहे.

तथापि, मुंबई फुटबॉल एरिनामधील सध्याच्या इंफ्रास्ट्रक्टरल सेटअपमुळे ते एएफसी चॅम्पियन्स लीगमधील मुंबई सिटी एफसीचे घरचे सामने आयोजित करू शकत नाहीत. त्याचमुळे मुंबई सिटी एफसीचे घरचे सामने पुण्यातील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे खेळले जाणार आहेत.

Neymar | Mumbai City FC
India football team: भारतीय फुटबॉल संघ चीनमध्ये खेळणार! एशियन गेम्समधील सहभागावर शिक्कामोर्तब

दरम्यान, ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वातील अल-नासर क्लबचा समावेश ग्रुप इ मध्ये झाला असून या ग्रुपमध्ये पर्सेपोलिस, एएल दुहेल आणि एफसी इस्टीक्लोल या क्लबचा समावेश आहे.

वेस्ट झोनची गटवारी

  • ए ग्रुप - पख्तकोर, अल फयहा, अहल एफसी, अल आयन एफसी

  • बी ग्रुप - अल साद, एफसी नासफ, अल-फैसाली, शाराह एफसी

  • सी ग्रुप - अल इत्तिहाद, सेफान एससी, एअर फोर्स क्लब, एजीएमके एफसी

  • डी ग्रुप - अल हिलाल, मुंबई सिटी एफसी, एफसी नासाजी मझांदरान, पीएफसी नवबाहोर नमांगन

  • इ ग्रुप - अल-नासर पर्सेपोलिस, एएल दुहेल, एफसी इस्टीक्लोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com