MS Dhoni Video: धोनीला पत्नीसमोरच एअर हॉस्टेसने केले चॉकलेट्स ऑफर, पाहा 'कॅप्टनकूल'ची रिऍक्शन

एमएस धोनीला पत्नी साक्षीसमोर एअर हॉस्टेसने चॉकलेट्स ऑफर करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

Air hostess offter chocolates to MS Dhoni, Watch Video: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची लोकप्रियता लपून राहिलेली नाही. त्याचा मोठा चाहतावर्ग जगभरात पाहायला मिळतो. त्याला भेटण्यासाठी अनेक चाहते विविध प्रयत्नही करताना दिसतात. अशीच एक एअर हॉस्टेस जी धोनीची चाहती आहे, तिचा धोनीला भेटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

निकिता अशा नावाने इंस्टाग्रावर अकाउंट असणाऱ्या एअर हॉस्टेसने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की धोनी त्याची पत्नी साक्षीसह विमानप्रवास करत आहे. यादरम्यान एअर हॉस्टेस चॉकलेट्स आणि अन्य खाद्यपदार्थांनी भरलेला ट्रे धोनीजवळ घेऊन जाते.

त्यावेळी धोनी त्यातील एकच पॅकेट उचलून बाकीसाठी नकार देतो आणि हसून तिच्याशी संवादही साधतो. तसेच तो एअर हॉस्टेसने दिलेला संदेशाचा कागदही स्विकारतो. त्यानंतर एअर हॉस्टेस तो ट्रे घेऊन परत जाते.

MS Dhoni
MS Dhoni: 'ओह कॅप्टन, माय कॅप्टन!', CSK ने शेअर केलेल्या 33 सेंकदाच्या 'त्या' व्हिडिओने फॅन्स इमोशनल

दरम्यान, या व्हिडिओमध्ये धोनीच्या जवळ असलेल्या टॅबलेटवर तो कँडी क्रश ही गेमही खेळताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कँडी क्रश ट्रेंडींगलाही होते. सध्या अशीही चर्चा आहे की कँडी क्रश गेम खेळताना धोनी दिसल्याने जवळपास ३० लाख लोकांनी ३ तासात या गेमचे ऍप डाऊनलोड केले आहे.

दरम्यान हा व्हिडिओ शेअर करताना एअर हॉस्टेसने तो तिचा क्रश असल्याचेही कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

MS Dhoni
MS Dhoni Fan: 'आय लव्ह यू माही...', वाढदिवसापूर्वीच धोनीसाठी चाहत्याने चक्क रक्तानं लिहिलं पत्र

धोनीच्या सीएसकने जिंकले आयपीएल

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने गेल्याच महिन्यात आयपीएल २०२३ स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल २०२३ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

त्यामुळे आता सर्वाधिक आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संयुक्तरिक्त्या अव्वल क्रमांकावर आले आहेत.

धोनीवर झाली शस्त्रक्रिया

एमएस धोनी आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामात डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्याच्या गुडघ्यावर डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांनी शस्त्रक्रिया केली. सध्या धोनी या शस्त्रक्रियेतून सावरत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com