Canada vs Morocco: कॅनडाला नमवून मोरक्को अंतिम 16 संघात दाखल

2-1 गोलफरकाने मात; मोरक्कोच्या नाएफ अगुएर्डकडून स्वयंगोल
Canada vs Morocco
Canada vs MoroccoDainik Gomantak
Published on
Updated on

Canada vs Morocco: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत ग्रुप एफमधील मोरक्को विरूद्ध कॅनडा सामना रंगतदार झाला. सामन्यात मोरक्कोने कॅनडावर 2-1 अशा गोलफरकाने मात केली.

(FIFA Football World Cup 2022)

Canada vs Morocco
PAK vs ENG: शानदार, जबरदस्त! दिवसभरात 4 शतके, 500 धावा; 112 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला मोरक्कोच्या हाकिम जिएच याने गोल करत मोरक्कोला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मोरक्कोच्या युसुफ एन नेसरी याने 23 व्या पहिला गोल करत मोरक्कोला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे मोरक्कोने 2-0 अशी आघाडी घेतली होती. दोन वर्ल्डकपमध्ये गोल करणारा युसूफ एन. नेसरी हा मोरक्कोचा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.

सामन्यात त्यानंतर 40 व्या मिनिटाला कॅनडाला एका गोलची आघाडी कमी करण्यात यश आले. पण ते देखील मोरक्कोच्या चुकीमुळे. मोरक्कोच्या नाएफ अगुएर्ड याने चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात आपल्याच गोलजाळ्यात मारला. या आत्मघाती स्वयंगोलमुळे कॅनडाला गोल मिळाला.

Canada vs Morocco
Rishabh Pant: सातत्याने फ्लॉप ठरणाऱ्या पंतला का मिळतेय संधी? प्रशिक्षक लक्ष्मण म्हणाले...

कॅनडाने स्पर्धेतील सुरवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे कॅनडाचा संघ आधीच अंतिम 16 संघांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर मोरोक्कोचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आला आहे. हा सामना जिंकल्यामुळे मोरक्कोला राऊंड ऑफ सिक्सटीनमध्ये जाण्याची संधी मिळाली आहे. एफ गटातील दुसऱ्या सामन्यावरही मोरक्कोचे पुढील फेरीतील स्थान अवलंबून होते. कारण दुसऱ्या सामन्यात बेल्जियमने क्रोएशियाला पराभूत केले असते तर बेल्जियम दुसऱ्या स्थानी आला असता आणि मोरक्कोची बाद फेरीची संधी हिरावली गेली असती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com