Rishabh Pant: सातत्याने फ्लॉप ठरणाऱ्या पंतला का मिळतेय संधी? प्रशिक्षक लक्ष्मण म्हणाले...

व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारतीय संघात रिषभ पंतला सातत्याने का संधी दिली जात आहे, याबद्दल भाष्य केले आहे.
Rishabh Pant
Rishabh Pant Dainik Gomantak
Published on
Updated on

Rishabh Pant: भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत गेल्या काही काळापासून मर्यादीत षटकांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अनेकांनी असेही म्हटले आहे की त्याच्याऐवजी अन्य यष्टीरक्षकांच्या पर्यायांचाही विचार करून पाहायला हवं.

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही पंतला (Rishabh Pant) मोठी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. पण असे असतानाही त्याला सातत्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघात का पाठिंबा दिला जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच आता भारताचे न्यूझीलंड दौऱ्यातील प्रभारी प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Rishabh Pant
T20 World Cup: पंत की कार्तिक! बांगलादेशविरुद्ध कोण खेळणार? द्रविडने हे दिले उत्तर

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या तिसऱ्या वनडेपूर्वी लक्ष्मण म्हणाले, 'भारतीय संघ भाग्यशाली आहे, की त्यांच्याकडे प्रतिभा असलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. पंतने चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केली आहे. फार पूर्वी नाही, अगदी नजीकच्याच काळात त्याने ओल्ड ट्रॅफर्डवर महत्त्वपूर्ण शतक केले होते. तो मॅचविनर आणि त्याला पाठिंबा देणे महत्त्वपूर्ण आहे.'

यापूर्वी भारताचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडनेही पंतला पाठिंबा दिला होता.

पंतने गेल्या वर्षभरात मर्यादीत षटकांमध्ये धावा करण्यासाठी संघर्ष केला आहे. तो 2022 वर्षात 12 वनडे सामने खेळला आहे आणि 336 धावा त्याने केल्या आहेत. तसेच 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1 अर्धशतकासह त्याने 364 धावा केल्या आहेत.

पण, कसोटी क्रिकेटमध्ये मात्र त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. त्याने आत्तापर्यंत 31 सामन्यांत 5 शतके आणि 10 अर्धशतकांसह 2123 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com