Mohammed Shami: जगावर छाप पाडणार 'हा' गोलंदाज! शमीच्या या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी.
Mohammed Shami
Mohammed ShamiDainik Gomantak
Published on
Updated on

Mohammed Shami, India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. या सामन्यात 6 षटके टाकताना शमीने 3.00 च्या इकॉनॉमीसह 18 धावा केल्या आणि 3 खेळाडू बाद केले.

दरम्यान, या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर (MOM) पुरस्कारही देण्यात आला. या मॅच-विनिंग कामगिरीबद्दल मोहम्मद शमीने (Mohammed Shami) एक मोठे वक्तव्य केले आहे. आगामी काळात जागतिक क्रिकेटवर राज्य करु शकणाऱ्या गोलंदाजाचे नाव त्याने दिले आहे.

Mohammed Shami
Mohammed Siraj Record: सिराजचा बंजरंगी पराक्रम, शानदार रेकॉर्डला घातली गवसणी

हा घातक वेगवान गोलंदाज जगावर राज्य करेल

उमरान मलिकला त्याच्या वेगामुळे उज्ज्वल भविष्य आहे, असे मत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे आहे. या युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या लाईन आणि लेन्थवर काम केले तर तो जागतिक क्रिकेटवर छाप पाडू शकेल. उमरानने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर सर्वांची मने जिंकली आहेत. तो 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो परंतु त्याला लाईन आणि लेन्थवर काम करण्याची गरज असल्याचे शमीने बोलून दाखवले.

मोहम्मद शमीने हे मोठे वक्तव्य केले

सामन्यानंतर उमरानशी बोलताना शमी म्हणाला की, 'मला तुला एकच सल्ला द्यायचा आहे. तुझ्या गतीने खेळणे मला सोपे वाटत नाही. तुला फक्त लाईन आणि लेन्थवर काम करण्याची गरज आहे. जर तु त्यावर नियंत्रण ठेवू शकला तर जागतिक क्रिकेटवर (Cricket) छाप पाडू शकशील.'

Mohammed Shami
Mohammed Siraj: आनंदाश्रू! सिराजचे कुटुंबीय मॅचचा थरार पाहण्यासाठी थेट मैदानात, आईने...

शमी पुढे म्हणाला की, 'तुझे भविष्य उज्ज्वल आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.'

उमरानने शमीला विचारले की, तुम्ही प्रत्येक सामन्यात इतके शांत आणि आनंदी कसे राहता, त्यावर शमी म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही देशासाठी खेळत असाल तेव्हा तुम्ही दडपण घेऊ नका. आपण आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवायला हवा.

Mohammed Shami
Mohammed Siraj: 'माझ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी...', बांगलादेश दौऱ्यावरून परतताना सिराजची हरवली बॅग

शमी पुढे असेही म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही शांत राहता आणि तुमच्या कौशल्यांवर विश्वास ठेवता, तेव्हा तुम्हाला तुमच्या रणनीतीनुसार जाण्याची चांगली संधी असते. पण स्वत:वर विश्वास ठेवून खेळपट्टीकडे लक्ष द्या आणि त्यानुसार गोलंदाजी करा.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com