Mohammed Siraj: 'माझ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी...', बांगलादेश दौऱ्यावरून परतताना सिराजची हरवली बॅग

ढाक्यातून परत येताना बॅग हरल्याची तक्रार सिराजने केली आहे.
Mohammed Siraj
Mohammed SirajDainik Gomantak

Mohammed Siraj: भारतीय क्रिकेट संघ नुकताच बांगलादेश दौऱ्यावरून मायदेशी परतला आहे. मात्र, या दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचे सामान हरवले आहे. याबद्दल त्याने स्वत:च माहिती दिली आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 25 डिसेंबर रोजी संपली. या मालिकेत भारताने 2-0 असा विजय मिळवला. या मालिकेनंतर 26 डिसेंबर रोजी ढाकामधून भारतात परतत असताना सामान विस्तारा एअरलाईन्सकडून हरवले असल्याची तक्रार सिराजने केली आहे.

Mohammed Siraj
IND vs SL: 'रेस्ट दिलीये की ड्रॉप केलंय?', टीम इंडियाची घोषणा होताच भन्नाट मीम्स व्हायरल

त्याने याबद्दल ट्वीट केले आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की 'मी 26 जानेवारीला UK182 आणि UK951 विमानाने ढाक्यातून दिल्ली मार्गे मुंबईला प्रवास करत होतो. मी माझ्या तीन बॅगा चेक इन केल्या होत्या. पण, त्यातील एक बॅग हरवली आहे. मला हा विश्वास देण्यात आलेला की बॅग सापडेल आणि त्वरित मला ती डिलिव्हर करण्यात येईल. पण, मला अजूनही याबद्दल काही समजलेले नाही.'

तसेच सिराजने पुढील ट्वीटमध्ये म्हटले आहे की 'माझ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी त्यात होत्या. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही प्रक्रिया जलद करा आणि मला लवकरात लवकर हैदराबादमध्ये बॅग डिलिव्हर करा.'

सिराजच्या या ट्वीटला विस्तारा एअरलाईन्सने उत्तर दिले आहे. त्यांनी लिहिले की 'हॅलो, मिस्टर सिराज, आम्हाला ऐकून वाईट वाटले. पण आमचा स्टाफ तुमचे सामान शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. त्याबाबत तुम्हाला लवकरच माहिती देण्यात येईल. तुमचा संपर्क आणि वेळ याबाबत आम्हाला प्लीज कळवा.'

यानंतर काही वेळातच सिराजने त्याची बॅग मिळाल्याबद्दल ट्वीट करून विस्तारा एअरलाईन्सचे आभार मानले.

सिराज आता बांगलादेश दौऱ्यावरून परतल्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे संघाकडून खेळताना दिसणार आहे. वनडे मालिका 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याआधी 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. टी20 मालिकेसाठी सिराजला भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com