Mohammed Siraj: आनंदाश्रू! सिराजचे कुटुंबीय मॅचचा थरार पाहण्यासाठी थेट मैदानात, आईने...

Mohammed Siraj Family: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत मोहम्मद सिराजने शानदार कामगिरी केली. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली.
Mohammed Siraj
Mohammed SirajDainik Gomantak
Published on
Updated on

Mohammed Siraj Family: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत मोहम्मद सिराजने शानदार कामगिरी केली. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. सिराजने शेवटच्या षटकात 2 बळी घेत सामना भारताच्या बाजूने वळवला, ज्यामुळे टीम इंडियाला सामना जिंकता आला. हैदराबाद हे सिराजचे होम ग्राउंड आहे. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला वनडे पाहण्यासाठी त्याचे कुटुंबीयही स्टेडियममध्ये पोहोचले होते. आता त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्याचवेळी सिराजच्या आईने आपल्या मुलासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

सामना पाहण्यासाठी कुटुंबीय आले होते

मोहम्मद सिराजची (Mohammad Siraj) परिस्थिती हालाखीची होती, परंतु त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर देशासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले. सिराजचे वडील ऑटो ड्रायव्हर आहेत. सिराज स्वतःच्या गुणवत्तेवर प्रथम आयपीएल खेळला आणि आता टीम इंडियासाठी (Team India) क्रिकेट खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला वनडे पाहण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंब पोहोचले होते. सगळे खूप आनंदी दिसत होते.

Mohammed Siraj
Mohammed Siraj: 'माझ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी...', बांगलादेश दौऱ्यावरून परतताना सिराजची हरवली बॅग

आईने हे सांगितले

पहिल्या वनडेदरम्यान मोहम्मद सिराजची आई त्याच्यासाठी प्रार्थना करताना दिसली. सामन्यानंतर बीसीसीआयने मोहम्मद सिराजच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणत आहे की, 'माझ्या मुलाने भारतासाठी चांगली कामगिरी करत राहावे आणि वर्ल्ड कपमध्येही खेळावे अशी माझी इच्छा आहे.'

Mohammed Siraj
ICC Test Ranking: टीम इंडिया कसोटीत पुन्हा नंबर वन! कांगारूंना मोठा धक्का

सिराजने उत्कृष्ट कामगिरी केली

पहिल्या वनडेत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात सिराजने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्याने 10 षटकात 46 धावा देऊन 4 विकेट घेतल्या, त्याच्यामुळेच टीम इंडिया विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरली. त्याने भारताकडून 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37 विकेट घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com