IND vs SL: मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये केला मोठा पराक्रम, बनला टीम इंडियाचा नंबर 1 गोलंदाज

Mohammed Shami Most Wickets: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात तीन सामने खेळून इतिहास रचला आहे.
Mohammad Shami
Mohammad Shami Dainik Gomantak
Published on
Updated on

Mohammed Shami Most Wickets: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात तीन सामने खेळून इतिहास रचला आहे. त्याने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट घेत मोठा पराक्रम केला.

तो एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांना मागे टाकले आहे, जे बऱ्याच काळापासून शीर्षस्थानी आहेत. एवढेच नाही तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक पाच बळी घेणारा गोलंदाज ठरला.

एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक विकेट्स (भारत)

मोहम्मद शमी (Mohammad Shami)- 45 विकेट्स

जवागल श्रीनाथ- 44 विकेट्स

झहीर खान- 44 विकेट्स

जसप्रीत बुमराह- 33 विकेट्स

अनिल कुंबळे - 31 विकेट्स

Mohammad Shami
IND vs SL: वर्ल्डकप, मुंबई अन् भारत वि. श्रीलंका! चाहत्यांच्या डोळ्यासमोर तरळल्या 12 वर्षांपूर्वीच्या आठवणी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच बळी घेणारे (भारत)

मोहम्मद शमी- 4

हरभजन सिंग- 3

जवागल श्रीनाथ- 3

जसप्रीत बुमराह- 2

कुलदीप यादव- 2

भारताने उपांत्य फेरी गाठली

यासह, भारतीय संघाने सलग सात विजयांसह 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव करत विश्वचषकातील सर्वात मोठा विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला.

शमीने पाच, सिराजला तीन आणि बुमराहला एक विकेट मिळाली. या संपूर्ण विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये बुमराहने 14 विकेट्स घेतल्या आहेत. तर बुमराहने सात सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या असून तो भारताचा (India) सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.

Mohammad Shami
IND Vs SL: बुमराहने वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास, कोणताही भारतीय गोलंदाज 'हा' पराक्रम करु शकला नाही!

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 357 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ 55 धावांत गारद झाला. भारताने हा सामना 302 धावांनी जिंकला. हा भारताचा विश्वचषकातील सर्वात मोठा आणि वनडे इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.

आता टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली आहे. त्याचे पुढील दोन सामने 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध आहेत. 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com