IND vs SL, Jasprit Bumrah Record: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विश्वचषक 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी करणे सुरुच ठेवले आहे. गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या 7व्या सामन्यापर्यंत त्याच्या नावावर 14 विकेट्स होत्या.
त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि त्याला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 357 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाला पहिल्या चेंडूवरच यश मिळाले. यासह बुमराहने इतिहास रचला. विश्वचषकात यापूर्वी कधीही घडले नव्हते असे त्याने केले.
दरम्यान, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) एकदिवसीय विश्वचषकात डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या 48 वर्षांच्या इतिहासात त्याच्या आधी कोणीही अशी कामगिरी करु शकले नव्हते.
बुमराहची चालू टूर्नामेंटमधली ही 15वी विकेट होती. गेल्या वर्षभरापासून तो दुखापतग्रस्त होता. 2022 च्या टी-20 विश्वचषकातही तो खेळला नव्हता. पण जेव्हापासून त्याने जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन केले तेव्हापासून तो अप्रतिम फॉर्ममध्ये आहे.
दरम्यन, या सामन्यात भारतीय संघाने 357 धावांची मोठी मजल मारली होती. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने पहिल्या पाच विकेट केवळ 14 धावांत गमावल्या. पहिल्या पाच षटकांत संघाची धावसंख्या चार विकेट्स गमावून 50 होती. मोहम्मद सिराजने पहिल्या दोन षटकांत तीन बळी घेतले.
तर बुमराहने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत विकेटचे खाते उघडले. याआधी आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. त्या सामन्यात श्रीलंकेच्या संघला केवळ 50 धावांवरच गुंडाळले होते.
तत्पूर्वी, फलंदाजीमध्ये शुभमन गिलने 92 धावांची, विराट कोहलीने (Virat Kohli) 88 धावांची आणि श्रेयस अय्यरने 82 धावांची शानदार खेळी खेळली होती. भारतीय संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात आपली सर्वोच्च धावसंख्या केली. यासह टीम इंडियाने स्पर्धेतील सलग 7 व्या विजयाकडे वाटचाल केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.