Mitchell Starc missed out: इंग्लंड आणि ऑस्ट्र्लिया संघात शुक्रवारपासून प्रतिष्ठेच्या ऍशेस या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. ही 73 वी ऍशेस मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना एजबस्टन बर्मिंगघमला होत आहे.
दरम्यान, या महत्त्वाच्या मालिकेच्या पहिल्याच सामन्याच ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. कसोटी चॅम्पियनशीपचे विजेतेपद जिंकून ऍशेस मालिकेत उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे.
ऑस्ट्रेलियाने अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले आहे. स्टार्कने मागच्याच आठवड्यात झालेल्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या, ज्यात विराट कोहली, अजिंक्य राहणे सारख्या फलंदाजांच्या विकेट्सहचा समावेश होता. तसेच दुसऱ्या डावात त्याने फलंदाजीत 41 धावांची खेळी केली होती.
स्टार्कऐवजी ऑस्ट्रेलियाने जोश हेजलवूडला संघात घेतले आहे. हेजलवूड गेल्या काही काळापासून टाचेच्या वरच्या भागातील दुखापतीचा सामना करत होता. पण तो यातून आता सावरला असून पहिल्या ऍशेस सामन्यातून ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन केले आहे.
त्यामुळे आता पहिल्या ऍशेस सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हेजलवूडशिवाय स्कॉट बोलंड आणि कर्णधार पॅट कमिन्स हे वेगवान गोलंदाजही आहेत. तसेच कॅमेरॉन ग्रीन हा देखील वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय आहे.
स्टार्कला बाहेर ठेवण्याबद्दल कमिन्सने सांगितले 'आम्हाला गोलंदाजांना पूर्ण मालिकेत रोटेट करावे लागणार आहे. तरी स्टार्कबद्दलचा निर्णय कठीण होता, कारण त्याने गेल्या आठवड्यात चांगली कामगिरी केली होती.'
इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही मोईन अली, जेम्स अँडरसन यांचे पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे मोईन अलीला या मालिकेसाठी निवृत्तीतून परत बोलवण्यात आले आहे. ऑली रॉबिन्सननेही पुनरागमन केले आहे.
इंग्लंड - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन
ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, स्कॉट बोलंड, जोश हेझलवूड
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.