Mitchell Marsh checked with umpire for 'no ball' before celebrating Shan Masood Wicket:
बुधवारपासून (3 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात कसोटी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना सुरु झाला आहे. सिडनीमध्ये हा सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा संघ सर्वबाद झाला. दरम्यान, पहिल्याच डावात एक नाट्यपूर्ण घटनाही घडली.
झाले असे की मार्श गोलंदाजी करत असलेल्या 26 व्या षटकातील पाचवा चेंडू पाकिस्तानचा कर्णधार शान मसूने खेळला, मात्र चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन मागे गेला. यावेळी स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथे सोपा झेल घेतला.
त्यानंतर मार्श आणि ऑस्ट्रेलिया संघाने सेलिब्रेशनही केले. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हा चेंडू नो-बॉल असल्याचे पंचांनी सांगितले. हा चेंडू टाकताना मार्शचा पाय क्रीजच्या पुढे पडला होता.
त्यामुळे मार्श वैतागला. पण 10 चेंडूनंतर 30 व्या षटकात मार्शने पुन्हा मसूदला बाद केले. विशेष म्हणजे यावेळीही चेंडू बॅटची कड घेत मागे गेला आणि दुसऱ्या स्लीपमध्ये स्मिथनेच झेल घेतला. यावेळी मार्शने सेलिब्रेशन करताना पंचांना विचारले की हा नो-बॉल नाही ना, त्यानंतरच त्याने सेलिब्रेशन केले.
दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 1 षटकात बिनबाद 6 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा नाबाद आहेत.
त्यापूर्वी पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 77.1 षटकात 313 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 88 धावांची खेळी केली. तसेच अमीर जमालने 82 धावा केल्या. याशिवाय आघा सलमाननेही 53 धावांची खेळी केली. त्याशिवाय मसूदने 35 धावांचे आणि बाबर आझमने 26 धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या आणि जोश हेजलवूड, नॅथन लायन आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.