FIFA World Cup 2022: रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाच्या पराभवावर मिया खलिफाचा जल्लोष...

रोनाल्डोच्या चाह्तयांच्या ट्विटरवर तीव्र प्रतिक्रिया
Mia Khalifa | Cristiano Ronaldo
Mia Khalifa | Cristiano RonaldoDainik Gomantak
Published on
Updated on

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याच्या पोर्तुगाल संघाला मोरक्कोकडून क्वार्टर फायनल राऊंडमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवामुळे पोर्तुगाल संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे जगभरातील रोनाल्डोच्या चाहत्यांना दुःख झालेले असताना पुर्वाश्रमीची पॉर्नस्टार मिया खलिफाने मात्र पोर्तुगालच्या पराभवावर जल्लोष साजरा करत रोनाल्डोच्या चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

(Morocco Beats Portugal)

Mia Khalifa | Cristiano Ronaldo
England vs Pakistan: इंग्लंडचा 'हा' खेळाडु ठरला कसोटी क्रिकेटमधील सिक्सर किंग! आत्तापर्यंत ठोकले इतके षटकार...

10 डिसेंबर रोजी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीतल मोरोक्कोने पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयाने मोरक्को फिफा वर्ल्डकपच्या सेमी फायनल स्पर्धेत पोहचणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे. मोरोक्कोच्या या ऐतिहासिक विजयामुळे अरब देशांसह संपूर्ण आफ्रिकेत जल्लोषाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत मिया खलिफाही मागे राहिली नाही. मोरोक्कोच्या विजयाचा आनंद तिनेही साजरा केला. मिया ही मूळची लेबनॉनची आहे. हा मध्यपुर्वेतील देश आहे.

Mia Khalifa | Cristiano Ronaldo
FIFA World Cup 2022: 'कदाचीत अर्जेंटिनाला जिंकून द्यायचंय', पोर्तुगालच्या खेळाडूंनी ओढले ताशेरे

मिया खलिफाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यानंतर तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मोरोक्कन ध्वजाचा इमोजी ट्विट केला आहे. तिच्या या ट्विटवर चाहत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी मियाला ट्रोलही केले आहे. मियाच्या पुर्वाश्रमीच्या प्रोफेशनवरूनही तिला टारगेट केले गेले आहे. खरेतर मियाने केवळ मोरक्कोचा ध्वज ट्विट केला आहे. तिने बाकी काहीही या ट्विटमध्ये लिहिलेले नाही, तरीदेखील तिला रोनाल्डोच्या चाहत्यांच्या रोषाला बळी पडावे लागले आहे.

दरम्यान, मोरोक्कोविरूद्धच्या सामन्यात पोर्तुगालच्या सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोनाल्डोचा समावेश नव्हता. 52 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून रोनाल्डो मैदानात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com