England vs Pakistan: इंग्लंडचा 'हा' खेळाडु ठरला कसोटी क्रिकेटमधील सिक्सर किंग! आत्तापर्यंत ठोकले इतके षटकार...

न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमच्या कामगिरीशी केली बरोबरी
Ben Stokes
Ben StokesDainik Gomantak
Published on
Updated on

Ben Stokes smashes most sixes in test cricket: पाकिस्तान विरूद्ध मुलतान येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्सने (Ben Stokes) एक षटकार ठोकला आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत तो सर्वोच्चस्थानी आला. स्टोक्सने याबाबतीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे.

(England vs Pakistan Test Series)

Ben Stokes
IND vs BAN: ईशान किशन म्हणतोय, '...तर 300 धावाही करू शकलो असतो'; Video

इंग्लंडचा कर्णधार असलेल्या स्टोक्सने 88 कसोटी सामन्यांमध्ये 107 षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे सध्या ब्रँडन मॅक्युलम इंग्लंड संघाचा प्रशिक्षक आहे. मॅक्युलमने कसोटी कारकिर्दीत 101 सामन्यांमध्ये 107 षटकार ठोकले आहेत.

31 वर्षीय बेन स्टोक्सने रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 41 धावा केल्या. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. या षटकारासह तो कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी पोहोचला. त्याने पहिल्या डावात 30 धावांच्या खेळीतही 1 षटकार मारला होता. स्टोक्स 17 डिसेंबरपासून कराचीत सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मॅक्क्युलमला मागे टाकू शकतो. दरम्यान, पहिली कसोटी जिंकून इंग्लंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

सेहवाग, रोहित शर्माची कामगिरी

टीम इंडियाबद्दल बोलायचे तर, माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने 104 कसोटीत 91 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माने एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार आहेत. रोहितने 235 एकदिवसीय सामन्यांमध्ये 256 आणि 148 टी-20 सामन्यात 182 षटकार मारले आहेत.

Ben Stokes
FIFA World Cup 2022: 'कदाचीत अर्जेंटिनाला जिंकून द्यायचंय', पोर्तुगालच्या खेळाडूंनी ओढले ताशेरे

वनडे क्रिकेटमध्ये षटकारांबाबत आफ्रिदी बादशाह

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने 398 सामन्यात 351 षटकार मारलेआहेत. त्याच्यानंतर वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 331 आणि श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने 270 षटकार ठोकले आहेत. भारताचा रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी या यादीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. रोहितने 256 तर धोनीने 229 षटकार ठोकले आहेत.

T-20 मध्ये रोहित शर्मा अव्वल

T-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने 148 सामन्यात 182 षटकार मारले आहेत. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा गप्टिल 173 आणि ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच 125 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल 124 षटकारांसह चौथ्या आणि इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन 120 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये गेल अव्वल

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. गेलने 483 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 553 षटकार मारले आहेत. त्याच्या खालोखाल रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रिदीचे नाव आहे. रोहितने 502 तर आफ्रिदीने 476 षटकार ठोकले आहेत. या यादीत न्यूझीलंडचे मॅक्युलम आणि गप्टिल चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. मॅक्युलमने 398 तर गुप्टिलने 383 षटकार ठोकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com