FIFA World Cup 2022: 'कदाचीत अर्जेंटिनाला जिंकून द्यायचंय', पोर्तुगालच्या खेळाडूंनी ओढले ताशेरे

पोर्तुगाल फिफा वर्ल्डकप 2022 मधून बाहेर पडल्यानंतर खेळाडूंनी रेफ्रीवर टीका केली आहे.
Bruno Fernandes
Bruno FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

Morocco vs Portugal: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत शनिवारी उपांत्यपूर्व फेरीतील पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पोर्तुगालला 1-0 अशा गोलफरकाने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पोर्तुगालचे या स्पर्धेतील आव्हानही संपले आहे.

त्यामुळे सामन्यानंतर पोर्तुगालचे खेळाडू खूपच निराश दिसून आले. त्यांचा अनुभवी खेळाडू पेपे आणि मिडफिल्डर ब्रुनो फर्नांडिसने तर सामन्यातील रेफ्रीवरच ताशेरे ओढले आहेत.

Bruno Fernandes
Brazil FIFA WC: मांजर ठरली ब्राझीलच्या विजयातील अडथळा? पाहा नक्की का होतेय चर्चा

पेपेने सामन्यानंतर एका पोर्तुगाली चॅनलशी बोलताना म्हटले की 'अर्जेंटिनाचे रेफ्री आमच्या सामन्यासाठी असणे स्विकारण्यासारखे नाही.' त्याने मेस्सीने अर्जेंटिनाच्या सामन्यानंतर रेफ्रीवर टीका केल्याची आठवणही करून दिली.

पेपे म्हणाला, 'आम्ही दुसऱ्या हाफमध्ये काय खेळलो होतो. त्यांचा गोलकिपर जमीनीवर पडला होता. तरी आम्हाला केवळ 8 मिनिटाचा भरपाई वेळ मिळाला. आम्ही एवढी मेहनत केली आणि रेफ्रीने केवळ 8 मिनिटे दिली.'

या सामन्यात रेफ्रीची भूमिका सांभाळणारे फेसुंडो टल्लो हे अर्जेंटिनाचे आहेत, विशेष म्हणजे त्यांचे असिस्टंट रेफ्रीही अर्जेंटिनाचे होते. दरम्यान, टल्लो यांचा हा रेफ्री म्हणून पहिलाच वर्ल्डकप आहे. त्यांना 2019 साली फिफाच्या रेफ्री पॅनलमध्ये सामील करण्यात आले होते.

Bruno Fernandes
FIFA World Cup 2022: अन् रोनाल्डो ढसाढसा रडला; मॅचनंतरचा भावनिक व्हिडिओ व्हायरल

ब्रुनो फर्नांडीसनेही रेफ्रींवर टीका करताना म्हटले की 'आम्हाला पहिल्यापासूनच हे माहित झालेले की कसे काम सुरू आहे. सामन्यापूर्वीच आम्हाला अंदाज आलेला की आम्हाला कशाप्रकारच्या रेफ्रीचा सामना करावा लागणार आहे. दुर्दैवी गोष्ट आहे की या स्पर्धेत पोर्तुगालचा एकही रेफ्री नाही. इथे त्याच देशांचे रेफ्री आहे, जे देश अद्यापही स्पर्धेत कायम आहेत. सर्वांना कदाचीत अर्जेंटिनाला ट्रॉफी जिंकून द्यायची आहे.

तो पुढे असेही म्हणाला, 'मला हे थोडे विचित्र वाटते, पण मला यात पडायचे नाही. कारण आमच्या पराभवासाठी हे एकच कारण नाही.'

दरम्यान, मोरोक्को पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे, ज्यांनी फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचा आता उपांत्य सामना गतविजेत्या फ्रान्सविरुद्ध भारतीय प्रमाणवेळेनुसार 15 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता होईल. फ्रान्सने इंग्लंडला उपांत्यपूर्व फेरीत मात दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com