Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या फायनलपूर्वी श्रीलंकेला जबरदस्त धक्का! प्रमुख गोलंदाजाच संघातून बाहेर

Final Match: आशिया चषकाच्या फायनलपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला असून स्टार गोलंदाज संघातून बाहेर झाला असून बदली खेळाडूचीही घोषणा करण्यात आली आहे.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023 Final, Major Injury Blow for Sri Lanka:

आशिया चषक 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. आता रविवारी (17 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पण या सामन्याआधी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.

श्रीलंकेचा प्रमुख फिरकीपटू महिश तिक्षणा या सामन्यातून बाहेर झाला आहे. याबद्दल श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.

आशिया चषकातील सुपर फोर फेरीत पाकिस्तानविरुद्ध १४ सप्टेंबर रोजी सामना खेळताना तिक्षणाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्याचे स्कॅन करण्यात आले असून त्याच्या स्नांयूंना दुखापत झाल्याचे आढळले आहे. त्याचमुळे त्याला आता अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे.

Sri Lanka
PAK vs SL: मोहम्मद रिझवान-इफ्तिखार अहमद जोडीचा कोलंबोमध्ये मोठा कारनामा, सहाव्या विकेटसाठी...

दरम्यान, त्याची ही दुखापत श्रीलंकेसाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण आगामी काळात ५ ऑक्टोबर पासून वनडे वर्ल्डकप सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी तिक्षणा श्रीलंकेच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक असणार आहे.

पण आता तो या स्पर्धेसाठी पूर्ण तंदुरुस्त असणार की नाही, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र श्रीलंका बोर्डाने सांगितल्याप्रमाणे तो त्याच्या रिहॅबिलिटेशन प्रक्रियेसाठी हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये दाखल होईल.

बदली खेळाडूची निवड

दरम्यान, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातून तिक्षणा बाहेर झाल्याने त्याच्या जागेवर आता श्रीलंकेच्या निवड समितीने सहन अर्चचीगेची निवड केली आहे. तो आत्तापर्यंत 2 वनडे सामने खेळला असून वरच्या फळीतील फलंदाज आहे. तसेच तो फिरकी गोलंदाजीही करतो.

Sri Lanka
Asia Cup 2023: बांगलादेशचा विजय अन् पाँइंट्सटेबल कन्फर्म! भारत अव्वल, तर पाकिस्तान तळाला

तिक्षणाची शानदार कामगिरी

दरम्यान, तिक्षणाची आशिया चषकात चांगली कामगिरी झाली होती. त्याने 5 सामन्यांत खेळताना 8 विकेट्स घेतल्या होत्या. तो या स्पर्धेत श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता. मात्र, आता त्याच्या बाहेर जाण्याने श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.

श्रीलंकेची कामगिरी

श्रीलंकेने आशिया चषकात आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की त्यांना या स्पर्धेत आत्तापर्यंत केवळ भारताविरुद्ध पराभवाचा धक्का बसला आहे.

त्यांना सुपर फोरच्या सामन्यात भारताविरुद्ध 41 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे आता अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा धक्का देऊन विजेतेपद राखण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com